समुद्रात जाणे जीवावर बेतलं, एकाच कुटुंबातील तिघे बेपत्ता

Three washed away in the sea of Oman : आता एक धक्कादायक बातमी. ओमान देशातील समुद्रात सांगलीचे तिघे बेपत्ता झाल्याचे घटना समोर आली आहे.  

Updated: Jul 13, 2022, 08:11 AM IST
समुद्रात जाणे जीवावर बेतलं, एकाच कुटुंबातील तिघे बेपत्ता title=

सांगली : Three washed away in the sea of Oman : आता एक धक्कादायक बातमी. ओमान देशातील समुद्रात सांगलीचे तिघे बेपत्ता झाल्याचे घटना समोर आली आहे. दरम्यान, दोन मुलांसह समुद्राच्या लाटेत वाहून गेलेल्या वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हे तिघेही समुद्रात बुडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

जत तालुक्यातील तिघेजण ओमान देशात समुद्राच्या लाटेत वाहून गेल्याची दुर्देवी घटना रविवारी (12 जुलै) दुपारी घडली आहे. या दुर्देवी घटनेत जत येथील शशिकांत म्हमाणे, त्यांची नऊ वर्षाची मुलगी श्रुती आणि सहा वर्षांचा मुलगा श्रेयस हे समुद्राच्या लाटेत वाहून गेले आहेत. अद्याप समुद्रात त्यांचा शोध लागलेला नाही. या घटनेला शशिकांत म्हमाणे यांचे बंधू अॅड. राजकुमार म्हमाणे यांनी दुजोरा दिला आहे.

मूळचे जत येथील शशिकांत म्हमाणे हे मागील अनेक वर्षांपासून दुबई येथील एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते. पत्नी सारिका, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती आणि अन्य एक मुलगी (नाव समजू शकले नाही ) यांच्यासह दुबई येथे राहण्यास होते. बकरी ईदमुळे सुट्टी असल्याने मृत्यू पावलेले शशिकांत, पत्नी, मुले आणि मित्रांसह दुबई जवळ असलेल्या ओमान या देशात फिरायला गेले होते. त्यावेळी ही घटना घडली.