'आई-बाबा माफ करा.. आता डोकेदुखी असाह्य होतेय' संभाजीनगरमध्ये तरुणीने संपवलं आयुष्य

Chhatrapati Sambhaji Nagar News: डोकेदुखी असह्य झाल्याने छत्रपती संभाजीनगरमधील एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे

Updated: Aug 2, 2023, 02:01 PM IST
'आई-बाबा माफ करा.. आता डोकेदुखी असाह्य होतेय' संभाजीनगरमध्ये तरुणीने संपवलं आयुष्य title=
sambhajinagar girl ends her life due to headache issue for 20 days

छत्रपती संभाजीनगरः डोकेदुखी असह्य झाली म्हणून एका तरुणीने आपले आयुष्य संपवले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या आई-वडिलांसाठी एक चिठ्ठीही लिहून ठेवली होती. त्यामुळंच या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. 

तसं पाहायला गेलं तर डोकेदुखी हा सामान्य आजार आहे. कधीकधी डोकेदुखी असह्य होते. पण निव्वळ डोकेदुखीच्या वेदना असह्य झाल्याने कोणी आयुष्य संपवू शकते का? हे विचार करण्याजोगे आहे. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेने सगळीकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. या तरुणीने टोकाचे पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोकेदुखीच्या वेदना असह्य झाल्यामुळं तरुणीने सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला आहे. हर्सूल सावंगी परिसरातून ही घटना समोर आली आहे. तर, प्रिया रमेश बुजडे असं या आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. 

प्रिया ही शहरातील एका विद्यालयात फुड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम शिकत आहे. गेल्या 20 दिवसांपासून प्रियाचे डोके दुखत होते. दिवसेंदिवस या वेदना अधिक तीव्र होत गेल्या. त्रास सहन करण्यापलीकडे गेल्याने तिने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठीदेखील तिने लिहली आहे. 

प्रियाने लिहलेल्या चिठ्ठीत तिने आत्महत्येचे कारण लिहलं आहे. तसंच, आई-बाबांची माफीही तिने मागितली आहे. मम्मी-पप्पा सॉरी, मला डोकेदुखी असह्य झाल्याने मी आत्महत्या करतेय, असं या तरुणीने चिठ्ठीत नमूद केलं होतं. तिच्या पालकांना या घटनेने एकच धक्का बसला आहे. परिसरातही खळबळ उडाली आहे.