Sambhaji Nagar: संभाजी नगरमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आदर्श पंतसंस्थेच्या ठेवीदारांच्या मोर्चा काढलाय. आदर्श पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा झालाय आणि त्यात अनेकांचे पैसे अडकले आहेत, पैसे द्यावे सरकारने मध्यस्थी करावी यासाठी हा मोर्चा होता. या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. त्यामुळे परिसरातील वातावरण चांगलेच तापले आहे. यावेळी आंदोलक आणि पोलिसात झटपट झालेली पाहायला मिळाली.
-संभाजीनगरात आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांनी मोर्चा काढलाय. मोर्चाला सुरूवात पोलिसांनी हा मोर्चा अडवला होता. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलीलांच्या नेतृत्त्वात मोर्चा काढण्यात आला आहे. पोलिसांनी मोर्चा अडवल्याने जलील आक्रमक झाले आहेत. आदर्श पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संभाजी नगर मध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आदर्श पंतसंस्थेच्या ठेवीदारांच्या मोर्चा काढलाय. हे गोरगरिबांचे पैसे आहेत. सरकारच्या नेत्यांना गरिबांसाठी वेळ नाही का? असा प्रश्न जलील यांनी विचारला आहे.
दुसरीकडे, संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळ बैठक पार पडली. तब्बल 7 वर्षांनंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह तब्बल 29 मंत्र्यांनी या बैठकीला उपस्थिती लावली. मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे प्रस्ताव सादर करण्यात आले. कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आले. इम्तियाज जलील हे मोर्चेकऱ्यांना घेऊन मंत्र्यांची भेट घेण्याच्या तयारीत आहेत.