संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना! खैरे, भुमरे की जलील कोण मारणार बाजी?

Sambhaji Nagar Lok Sabha Election Results 2024: संभाजीनगर लढतीकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. इथे संदिपान भुमरे आघाडीवर आहेत. 

नेहा चौधरी | Updated: Jun 4, 2024, 01:27 PM IST
संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना! खैरे, भुमरे की जलील कोण मारणार बाजी? title=
Sambhaji Nagar Lok Sabha Election Results 2024

Sambhaji Nagar Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणूक 2024 यंदा अतिशय महत्त्वाची आहे. कारण पक्षा पक्षांमधील मतभेद, बंडखोरी आणि त्यातून नवीन पक्षांची स्थापना त्यामुळे राज्यातील अनेक मतदारसंघ यावेळी चर्चेत आले. त्यातील एक म्हणजे संभाजीनगर (Sambhaji Nagar) जे मुळचं औरंगाबाद या नावाने ओळखलं जायचं. इथे तिरंगी लढत पाहिला मिळाली. एमआयएम पक्षाचे नेते आणि विद्यमान खासदार इम्तियाज (Imtiyaz Jalil) जलील, एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यात प्रमुख लढत झाली. आतापर्यंत जे आकडे हाती आले आहेत त्यानुसार

संभाजीनगर  
संदिपान भुमरे (शिंदे गट शिवसेना) - 165008
इम्तियाज जलील (MIM) -164320 
चंद्रकांत खैरे (उद्धव ठाकरे गट UBT) -105992

संदिपान भुमरे हे 18688  मतांनी आघाडीवर

लोकसभा निवडणुकीची प्रत्येक अपडेट - Maharashtra Nivadnuk Nikal 2024 LIVE: मुंबईतून ठाकरे गटाच्या 'या' उमेदवाराला 10000+ ची आघाडी

संदिपान भुमरे हे 6021 मतांनी आघाडीवर52 दरवाजांचं मराठवाड्याच्या राजधानीचं शहराचे चंद्रकांत खैरं तब्बल 20 शिवसेनेचे खासदार होते. तर गेल्या पाच वर्षांपासून संभाजीनगर एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्या ताब्यात आहे. 1999, 2004, 2009 आणि 2014 असे चार टर्म चंद्रकांत खैरे खासदार झालं खरं पण पाचव्यांदा त्यांचा पराभव झाला. आता खैरे सहाव्यांदा त्याचं नशिब आजमावत आहेत. 

2009 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या उत्तमसिंह पवारांचा 33 हजार मतांनी पराभव केला. तर 2014 मध्ये काँग्रेसच्या नितीन पाटलांना दीड लाख मतांनी धुळ चारली. मात्र 2019 मध्ये एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी खैरेंना केवळ 4 हजार 400 मतांनी मात केली. 

देशाची कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर प्रत्येक अपडेट - Lok Sabha Nivadnuk Nikal LIVE 2024: मध्य प्रदेशात भाजप विरोधकांना क्लीन स्वीप देण्याच्या मार्गावर; देशभरातील निकाल कुणाच्या बाजुनं?

त्या वेळच राजकीय चित्र पाहता अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधवांना मिळालेल्या 2 लाख 83 हजार मतांमुळं खैरेंचा पराभव असं राजकीय विश्लेषकांचं मत होतं. यंदा लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरकरांनी 63.07 टक्के मतदान केलं. हा आकडा पाहता छत्रपती संभाजीनगरमध्ये अटीतटीची लढत पाहिला मिळतेय. 

या मतदारसंघातही शिवसेनेच्या बंडखोरीचा फटका उमेदवारी निवडताना दिसून आला. खैरेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही महायुतीचा उमेदवार निश्चित होत नव्हता. पण संदिपान भुमरे यांना उमेदवारी दिली पण त्यांना प्रचार करण्यास कमी वेळ मिळाला. संभाजीनगरमधील मतदारांबद्दल बोलायचं झालं तर आरक्षणाच्या मुद्द्यामुळे मराठा समाज नाराज होता. त्यामुळे संभाजीनगर खैरेंना सहाव्यांदा विजयाचा ताज चढवतील की जलील पुन्हा खासदार होईल हे चित्र काही वेळात स्पष्ट होईल.