आधारकार्ड दाखवले तरच मिळणार शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन; निर्णयामुळे खळबळ

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना आता सोबत आधारकार्ड ठेवावे लागणार आहे. कारण, साई संस्थानने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

Updated: Oct 11, 2023, 05:18 PM IST
आधारकार्ड दाखवले तरच मिळणार शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन; निर्णयामुळे खळबळ title=

Shirdi Sai Baba : शिर्डीचा साईबाबा हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. केवळ महाराष्ट्र आणि देशातूनच नाही तर जगभरातून लाखो भाविक साई बाबांच्या दर्शनासाठी येत असतात. यामुळे शिर्डीच्या साई मंदिरात नेहमीच भक्तांची मोठी गर्दी असते. साई दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना आता आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार आहे. कारण साई संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता आधारकार्ड दाखवले तरच शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन मिळणार आहे. या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे. 

साई बाबाचे दर्शन आणि आरती पासमध्ये संस्थानने केला बदल

श्री साईबाबांच्या दर्शन पास आणि आरती पास सुविधांमध्ये साई संस्थान प्रशासनाने बदल केला आहे. साईंच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची फसवणूक होऊ न देण्याची काळजी साई संस्थान घेणार आहे. यासाठी श्री साईबाबा संस्थानने उपाययोजना सुरु केल्या आहे. पुर्वीच्या दर्शन आणि आरती पासेसच्या पद्धतीमध्ये बदल करण्यात आला आहे. आता दर्शन पास  आणि आरती पास घेण्यासाठी साईभक्तांचा मोबाईल नंबर आणि आधारकार्ड नंबर हा बंधनकारक करण्यात आला आहे.  यात गरज पडल्यास आणखी बदल केला जाणार असल्याचं श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी माध्यमांना सांगितले. तर, साईभक्तांची मंदिर परिसरातील एजंटाकडून फसवणूक होऊ नये म्हणून साई संस्थानच्या ऑनलाईन वेबसाईटवर बुकींग करावे असे आवाहन CEO पी.शिवा शंकर यांनी भक्तांना केले आहे.

तुळजाभवानी देवीच्या मंदिर विकास आराखड्यावरून वाद पेटला

तुळजाभवानी देवीच्या मंदिर विकास आराखड्यावरून वाद पेटलाय आहे. तुळजाभवानी मंदीर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून हा वाद सुरु आहे. दर्शन मंडप हा घाटशीळ येथे करण्यास पुजारी, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. यासाठी उद्या पुजारी आणि व्यापा-यांनी तुळजापूर बंदची हाक दिलीये. दर्शन मंडप हा तुळजाभवानी देवीच्या मुख्य महाद्वार इथंच असावा अशी मागणी व्यापारी आणि स्थानिकांनी केली. दर्शन मंडपाची जागा बदलल्यास व्यापा-यांचं नुकसान होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.