Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी हा अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे. या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत संजय गायवाड यांनी धक्कादायक दावा देखील केला आहे. शंभूराजे देसाई यांच्याशी संपर्क साधला असताा त्यांनी अप्रत्यक्षपणे याला दुजोरा दिला आहे.
उद्धव ठाकरे गटासोबत असताना तत्कालीन महाविकास आघाडीसरकरामध्ये एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. यावेळी नक्षलवाद्यांनी एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या बाबत एक बैठक शंभूराजे देसाई यांच्या कडे सुरू होती. यावेळी शिंदे यांना झेड प्लस सिक्युरिटी देण्याचे ठरले होते. त्याचवेळी देसाई यांना उद्धव ठाकरे यांचा फोन आला आणि एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सिक्युरिटी देऊ नका असे सांगितले. याचा अर्थ काय होतो. नक्षलवाद्यांच्या धमकीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा उद्धव ठाकरे यांचा कट होता असा खळबळजनक दावा संजय गायवाड यांनी केला आहे.
नक्षलवादी यांच्या हातून एकनाथ शिंदे यांना मारण्याचा उद्धव ठाकरे यांचा कट होता. त्यामुळे आम्ही वेगळे होण्याचे पाऊल उचलले नसते तर शिंदे आज जिवंत नसते असेही संजय गायकवाड म्हणाले. संजय गायवाड यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर, ठाकरे गटाचे नेते चंद्रकात खैरे यांनी शिंदे गटाच्या आमदाराचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
ड्रग्जमाफिया ललित पाटीलसाठी दादा भुसेंनी ससून रुग्णालयाला फोन केला होता, असा मोठा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय. ड्रग्जमाफिया ललितला ससूनमध्ये अॅडमिट करण्यासाठी भुसेंनी फोन केला होता, त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासा, असं अंधारेंनी म्हटलंय. ललित पाटील ससूनमध्ये अॅडमिट असताना तिथूनच तो ड्रग्ज रॅकेट चालवायचा... ससून हॉस्पिटलच्या बाहेर ड्रग्ज सापडलं होतं. तसंच ससूनमध्ये राहण्यासाठी ललित पाटील वरिष्ठांना रोज 70 हजारांची लाच देत होता. तर आपण कुठल्याही चौकशीला तयार आहोत, असं आव्हान दादा भुसेंनी दिलंय.