मुंबई : होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यासाठी कोकण रेल्वेने जादा गाडयांची व्यवस्था केली आहे. होळी कोकणात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. होळीसाठी चाकरमानी आवर्जून आपल्या गावी जातो. चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या विशेष गाड्याचे बुकींग १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
कोकणात जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनल, पनवेल येथून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. होळीत गावी जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने अनेकवेळा आरक्षण मिळत नाही. त्यामुळे अनेकांना होळीसाठी गर्दीतून प्रवास करावा लागतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर या जादा गाड्या सोडण्यात येत आहेत.
#BreakingNews । होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यासाठी कोकण रेल्वेने जादा गाडयांची व्यवस्था केली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनल आणि पनवेल येथून या गाड्या सुटणार आहे. ६ ते २८ मार्च दरम्यान गाड्या धावणार आहेत. याचे बुकिंग १४ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.@KonkanRailway pic.twitter.com/O1SZBC02tp
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 12, 2020
गाडी क्रमांक - ०१०३९/०१०४० लोकमान्य टिळक टर्मिनल - करमाळी - लोकमान्य टिळक टर्मिनल आणि गाडी क्रमांक १०१०४२/१०१०४१ - करमाळी - पनवेल - करमाळी आणि गाडी क्रमांक १०१०४३/१०१०४४ - लोकमान्य टिळक टर्मिनल - करमाळी - लोकमान्य टिळक टर्मिनल या जादा गाड्या सोडण्यात येणार आहे.
०१०३९ ही गाडी (साप्ताहिक) ६, १३, २० आणि २७ मार्च २०२० दरम्यान धावणार आहे. तर ०१०४० ही परतीची गाडी ८, १५, २२ आणि २९ मार्च २०२० दरम्यान धावणार आहे. या गाडीला थांबा ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंडवाडी आणि थिविंम असणार आहे. एकूण २२ कोच असून टू टायर एक, थ्री टायर चार, स्लिपर १२ आणि जनरल तीन कोच असणार आहेत.
तसेच ०१०४२ आणि ०१०४१ या (साप्ताहिक) गाड्या करमाळी आणि पनवेल येथून सुटणार आहेत. ०१०४२ ही करमाळी - पनवेल गाडी ७, १४, २१ आणि २८ मार्च २०२० रोजी सुटणार आहे. ती पनवेलला रात्री ८.१५ वाजता पोहोचेल. तर ०१०४१ पनवेल ते करमाळी ही गाडी पनवेल येथून रात्री ९ वाजता सुटेल. ही गाडी ७, १४, २१ आणि २८ मार्च २०२० रोजी सुटणार आहे. ती करमाळीला सकाळी ८.३० वाजता पोहोचेल.
थिविंम, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभवाडी, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव आणि रोहा येथे या गाडीला थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एकूण २२ कोच असून टू टायर एक, थ्री टायर चार, स्लिपर १२ आणि जनरल तीन कोच असणार आहेत.