बापरे! समृद्धी महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट, Video आला समोर

समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या कारने अचानक घेतला पेट घेतल्याचा Video समोर आल्याने खळबळ, कारमध्ये पुण्यातलं कुटुंब होतं, सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही

Updated: Dec 15, 2022, 09:50 PM IST
बापरे! समृद्धी महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट, Video आला समोर title=

Maharashtra Samruddhi Mahamarg : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर  (Samruddhi Express Way) गेले सलग दोन दिवस अपघाताच्या दोन घटना घडल्या होत्या. त्यानंतर समृद्धी महामार्गावर एका तरुणाने चक्क गोळीबार केल्यााच व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता समृद्धी महामार्गावर आणखी एक घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर धावत्या कारने पेट घेतला असून याचा व्हिडिओ समोर आला आहे. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक (Burning Car) झाली

कारला अचानक लागली आग
समृद्धी महामार्गावर वैजापूरच्या गलांडे वस्तिजवळ कारने अचानक पेट घेतला. शिर्डीमार्गे पुण्याला जात असताना कारला आग लागली.
पुण्याचे रहिवासी असलेले राजपूत यांची ही कार असल्याचं समोर आलं आहे.  या कारमध्ये राजपुत कुटुंबिय होतं. सुदैवानं संपूर्ण सुखरूप आहे. पण कार पूर्णपणे जळून खाक झाली. कारला आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

समृद्धी महामार्गावरुन प्रवास करताना घ्या काळजी
समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणार असाल अतिवेगाने गाडी चालवणं शक्यतो टाळा. महामार्गावर वेगवान प्रवास करताना वाहनांचे टायर कधीही धोका देऊ शकतात. त्यामुळे ऑटोमोबाईल तज्ज्ञांनी या प्रवासात टायरची काळजी घेण्याचा सल्ला दिलाय. 

टायर फुटून अपघात होऊ शकतो
समृद्धी महामार्गाने वेगाने गाडी चालवताना टायरवर दाब येऊन टायर फुटून अपघात होऊ शकतो. ताशी 150 किमी वेगाने या मार्गावरुन प्रवास करु शकता, पण वाहनाच्या टायरमध्ये साधी हवा भरल्यावर नॉनस्टॉप गाडी चालवल्यास टायरमधील हवा प्रसरण पावून टायर फुटण्याचा धोका असतो. त्यामुळे नायट्रोजन भरावं, असा सल्ला देण्यात आला आहे. टायरची साईडवॉलही चेक करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. 

मुंबई - नागपूर सात तासात
नागपूर ते शिर्डीपर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. हा मार्ग 10 जिल्ह्यांतील 392 गावांमधून धावेल आणि दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सात तासांपर्यंत कमी करेल. आजपासून एसटी धावणार असून सामान्य नागरिकांसाठी समृद्धी महामार्ग खुला होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवास हा 17 तासांवरुन हे अंतर 7 तासांवर येणार आहे. सध्या नागपूर ते मुंबई हा बाय रोड प्रवास करताना 15 तास लागतात.