RTO News: आता थांबायचं नाही, पुढे जायचं; आरटीओकडून मोठा निर्णय

mumbai-pune expressway: रस्त्यावरून गाडी चालवताना अशा अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या याची दक्षता घेत आरटीओ विभागानं सुरक्षततेच्या दृष्टीनं एक मोठं पाऊल उचललं आहे यासाठी आरटीओची पथक पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवरती आजपासून तैनात करण्यात येणार आहेत.

Updated: Dec 1, 2022, 02:06 PM IST
RTO News: आता थांबायचं नाही, पुढे जायचं; आरटीओकडून मोठा निर्णय  title=

चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मवाळ: हल्ली रस्त्यावरील अपघाताच्या घटना (pune - mumbai expressway) वाढताना दिसत आहेत. त्यामुळे सगळीकडेच सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या त्यामुळे रस्त्यावरून गाडी चालवताना अशा अनेक गोष्टींची काळजी (precuration in traffic) घेणे आवश्यक आहे. सध्या याची दक्षता घेत आरटीओ विभागानं सुरक्षततेच्या दृष्टीनं एक मोठं पाऊल उचललं आहे यासाठी आरटीओची पथक पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवरती (rto in mumbai - pune expressway) आजपासून तैनात करण्यात येणार आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरती अपघातांचं प्रमाण वाढू लागलं आहे त्यामुळे चालकांना कायमच वाहनं कशी चालवायची याबाबत योग्य प्रशिक्षण आणि योग्य ती काळजी कशी घ्यायची याची योग्य ती माहिती असणं आवश्यक असतं. त्यामुळे आता या नव्या उपक्रमामुळे नक्कीच वेगळा बदल होऊ शकेल. (RTO teams deployed on Pune Mumbai Express Highway from today)

पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर तसेच जुन्या पुणे मुंबई महामार्गावर अपघात रोखन्यासाठी आजपासून पुढील सहा महीने 24 तास सुरक्षा तैनात (Devendra Phadanvis) करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत रस्त्यावरील जीवीत व वित्त हानी टाळण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांना आदेश देण्यात आले होते. त्यानुसार परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षा जनजागृती व अंमलबजावणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आल आहे. या उपक्रमासाठी मोटार वाहन (motor) विभागातील मुंबई, पुणे, पनवेल, पिंपरी चिंचवड या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांची एकूण बारा पथकांची निर्मिती करण्यात आलेली असून त्या प्रत्येक पथकात तीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही महामार्गावर यामधील प्रत्येकी सहा पथके व पंधरा अधिकारी चोवीस तास कार्यरत राहणार आहेत.

हेही वाचा - गावची शान! तीन शेतकरीपुत्र एकाच वेळी अग्निवीर; ढोलताशा, डीजे लावून गावभर मिरवणूक

परिवहन अधिकारी काय म्हणाले?

आजपासून ते 31 मे 2023 या कालावधीत आरटीओ विभागाकडून सुरक्षा उपक्रम राबवला जाणार आहे. अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी सांगितले की महामार्गांवर अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतात त्यामुळे कुटूंबियांसाठी आणि मित्रपरिवारासाठी (friends and family) फार अवहलेना सोसावी लागते तेव्हा अशावेळी वाहूतकीदरम्यान चालकांनी काळजी घेणे गरजेचे असते अशावेळी आम्ही या पथकांद्वारे दिवसाचे चोविस तास येथे सुरक्षा उपक्रम राबवणार आहोत, असं ते म्हणाले.

वाहतूक कोंडीचा प्रश्न 

महिन्याभरापुर्वी मुंबईकडून पुण्याकडे जाताना खालापूर टोलनाक्यावर दीड किलोमीटरच्या (kilometer) रांगा लागल्या होत्या. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गांवर सलग दुसऱ्या दिवशी बोरघाटात अमृतानजन पुलाजवळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे वाहनधारकांसह अनेकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. मुंबई - पुणे वाहतूक मंदावली होती. पुण्याच्या दिशेने वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. दिवाळीच्या सुट्टीमुळे ही वाहतूक कोंडी झाली. रस्त्यावर अचानक वाहनांची संख्या वाढल्याने मुंबई - पुणे  मार्गावर (mumbai - pune expressway) वाहतूक कोंडी झाल्यानं त्यातच अवजड वाहनांची गर्दी झाल्याचे दिसून आली.