Maratha reservation : सरकारने आरक्षणाच्या बाबतीत कोणत्याही हालचाली केली नाही म्हणून पुन्हा आमरण उपोषण सुरू करत आहे. पहिलं 17 दिवसांचं आमरण उपोषण झालं, आता कोणत्याही आरोग्य सेवा पाणी घेणार नाही, असं म्हणत मनोज जरांगे (Manoj jarange Patil) यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची पळापळ सुरू झाल्याचं चित्र समोर येतंय. दोन्ही नेत्यांनी सुपरफास्ट दिल्ली दौरा केलाय. त्यामुळे आता येत्या काळात आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावरून मोठा राडा होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. अशातच आता राजकीय वर्तुळातून देखील मनोज जरांगे यांना समर्थन मिळताना दिसत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात आजपासून सुरुवात झाली आहे. पुण्यात शरद पवार यांच्या सभेनंतर संघर्ष यात्रा सुरु झालीये. अशातच आता संघर्ष यात्रेदरम्यान रोहित पवार यांनी मनोज जरांगे यांना समर्थन दिलं आणि एक दिवस अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा समाजाला संवैधानिक पद्धतीने आणि टिकणारं आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे-पाटील हे अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. त्यांना आणि मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून युवा संघर्ष यात्रा सुरू असताना उद्या एक दिवस मी अन्नत्याग करत आहे, अशी घोषणा रोहित पवार यांनी केली आहे.
मराठा समाजाला संवैधानिक पद्धतीने आणि टिकणारं आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे-पाटील हे अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. त्यांना आणि मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून #युवा_संघर्ष_यात्रा सुरू असताना उद्या (गुरुवार) एक दिवस मी अन्नत्याग करत आहे.#YuvaSangharshYatra #yuva… pic.twitter.com/xY4npdi4CS
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 25, 2023
दरम्यान, युवा संघर्ष यात्रा सणसवाडीमध्ये प्रवेश करताच नागरिकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत आणि टाळ मृदंगाच्या तालावर भजन गात स्वागत केलं. तसंच ग्रामस्थांच्यावतीने सरपंच सुवर्णा रामदास दरेकर यांनी सत्कार केला. यावेळी भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. रोहित आरआर पाटील, विकास लवांडे, देवदत्त निकम, इतर सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.