थर्टी फस्टच्या रात्री मुंबई-आग्रा महामार्गावर थरार; नाशिकजवळ प्रवासी जीव मुठीत घेवून पळाले

मुंबई-आग्रा महामार्गावर प्रवाशांना लुटण्यात आले आहे. थर्टी फस्टच्या रात्री हा थरार घडला आहे. 

Updated: Jan 1, 2024, 07:30 PM IST
थर्टी फस्टच्या रात्री मुंबई-आग्रा महामार्गावर थरार; नाशिकजवळ प्रवासी जीव मुठीत घेवून पळाले title=

Nashik Crime News : थर्टी फस्टच्या रात्री सर्वत्र जल्लोष साजरा केला जात असताना   मुंबई नाशिक आग्रा महामार्गावर अत्यंत थराराक घटना घडली आहे.  मुंबई नाशिक आग्रा महामार्गावर एका खाजगी वाहनावर कोयता आणि चौपरने हल्ला करत दरोडा टाकण्यात आला. दीड लाखाचा ऐवज आरोपींनी लुटला आहे. प्रवासी जीव मुठीत घेवून पळाले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये दहशत पसरली आहे. 

नेमकं काय घडलं?

मुंबई नाशिक आग्रा महामार्गावर मुंडेगाव शिवरात तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्र्यंबकेश्वर कडे जाणाऱ्या वाहनांवर कोयता आणि चोपरने हल्ला केला. जवळपास दीड लाख रुपयांचा ऐवज दरोडखोरांनी लुटल आहे.  थर्टी फस्टच्या मध्यरात्री तीन ते चार वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या खाजगी वाहनात दिवा येथील पाच प्रवासी होते. दरोडेखोरांनी हल्ला केल्यानंतर  यातील प्रवाशांनी पळ काढत आपला जीव वाचवला तर यात कोणीही जखमी नाही. घोटी पोलीस स्टेशनचे अधिकारी या संदर्भात तपास करत आहेत तर तीन संशयितांविरद्ध घोटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

झायलो आणि ट्रकच्या धडकेत तिघे ठार

श्रीगोंदा तालुक्यातील नगर - दौंड रोडवर घारगाव परीसरात महींद्रा झायलो आणि ट्रक यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेमधे  3 जण ठार तर,7 जण गंभीर जखमी झाले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार कल्याण येथील रहिवासी असलेले शेख कुटुंबीय बेलवंडी फाटा मार्गे नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोळगाव येथील कोळगाववाले बाबांच्या दर्यामध्ये दर्शनासाठी महिंद्रा झायलो (क्र. एम.एच. 04 ई.डी. 7126) या कारमधून येत असताना, घारगाव परिसरात नगर दौंड महामार्गावरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर, ओव्हरटेक करण्याच्या नादात, समोरुन भरधाव वेगाने नगर कडून दौडकडे सीएनजी गॅस वाहतूक करणारा टेम्पो (क्र. एचआर 55, एपी 9964) शी कारची घारगांव परीसरात समोरासमोर जोराची धडक झाली.
यामधे, शेहबाज अजीज शेख वय 30, मोहम्मदगाजी रोप बांगी (वय 13), लुसेन शौयाब शेख (वय 23) सर्व राहणार बैलबाजार,वाशीम कल्याण मुंबई  हे तिघे जण जागीच ठार झाले आहेत. तर या अपघातात 7 जण जखमी झालेले आहेत. जखमींवर अहमदनगर येथील पॅसिपिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन गाजरे हे करत आहेत.