धारावीला सिंगापूर बनवणार अदानी; कायापालट करण्यासाठी उभी करणार ग्लोबल टीम, रहिवाशांना मिळणार या सुविधा

Dharavi Redevelopment: धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड(DRPPL) ने पायाभूत सुविधा उभारण्यासाठी जागतिक दर्जाची टीम उभी केली आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 1, 2024, 07:11 PM IST
धारावीला सिंगापूर बनवणार अदानी; कायापालट करण्यासाठी उभी करणार ग्लोबल टीम, रहिवाशांना मिळणार या सुविधा title=
Adani Group hires global team for rebuilding Asia biggest slum Mumbai Dharavi Redevelopment

Dharavi Redevelopment: 19 वर्ष रखडलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प उद्योगपती गौतम अदानी यांना मिळाला आहे. अदानी समूहाकडून आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा पुनर्विकास केला जाणार आहे. अदानी समूहाकडून धारावीत अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. धारावीच्या पुर्नविकासासाठी अदानी समूहाने मेगा प्लान तयार केला आहे. सिंगापूरच्या धर्तीवर धारावीचा कायापालट केला जाणार आहे. नेमका काय आहे हा प्लान जाणून घेऊया. 

धारावीसाठी काय आहे मेगाप्लान?

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी मुंबईत आहे. धारावीच्या पुर्नविकासासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र या प्रस्तावित प्रकल्पाला आता गती मिळाली आहे. धारावी पुर्नविकासाची जबाबदारी अदानी समुहाकडे गेली आहे. धारावीच्या रिडेव्हलेपमेंटसाठी अदानी समूहाने एक ग्लोबल टीम तयार केली आहे. यासाठी परदेशातील कंपन्यांसाठी भागीदारीदेखील केली आहे. अदानी समूह धारावी पूर्नविकास प्रकल्प कंपनीने देशातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कायापालट करण्यासाठी अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध कंपनी Sasaki च्या टीमला बोलवलं आहे. त्याचबरोबर ब्रिटेनची कंन्सलटेंन्सी फर्म Buro Happold आणि आर्किटेक्ट हफीज कॉन्ट्रेक्टरसोबत हातमिळवणी केली आहे. तसंच, सिंगापूरमधील तज्ज्ञांना या प्रकल्पात आपल्या सोबत घेतले आहे. जगभरातील टॉप ग्लोबल टीमना सोबत घेऊन अदानी समूह धारावीचा पुर्नविकास करणार आहे. 

धारावीच्या रहिवाशांसाठी जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचा प्रयत्न अदानी समूहाचा आहे.यासाठी सिंगापूर शहराचा आदर्श समोर ठेवण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याचे कारण म्हणजे 1960च्या दशकात सिंगापूर शहराची अवस्थाही धारावीसारखीच होती. मात्र, आज सिंगापूर शहरातील बांधकाम आणि विकास साऱ्या जगाला थक्क करणारा आहे. सिंगापूर गृहविकास मंडळाने १२ लाख घरांची उभारणी केली होती. तसंच, जागतिक दर्जाच्या सुविधा दिल्या होत्या. त्यामुळं त्यांचे अनमोल कौशल्य व अनुभवांचा उपयोग करून त्यांचा समावेश धारावी पुनर्विकास प्रकल्पात करण्यात येणार आहे. 

धारावीतील रहिवाशांना काय सुविधा मिळणार?

धारावी पुनर्विकास प्रकल्पाची व्याप्ती खूप आहे. त्यामुळं धारावीचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी साधारण तीस वर्षांचा कालावधी लागू शकतो. अदानी समूह  धारावीसाठी स्वतंत्र शौचालये, हवेशीर स्वयंपाकघर आणि कौटुंबिक वास्तव्यासाठी तसेच विश्रांतीसाठी परिपूर्ण खासगी घरांची निर्मिती, दुकाने, व्यवसाय, स्थानिक रहिवाशांसाठी सोयी, नोकरीच्या संधी यारख्या सुविधा मिळणार आहेत. त्यामुळं धारावी झोपडपट्टीच्या ऐवजी एक नव शहर वसणार आहे. 
धारावी

अदानी समूहाने नोव्हेंबर 2020मध्ये धारावी पुर्नविकास प्रकल्पासाठी सर्वाधिक बोली लगावली होती. अदानी समूहाने जवळपास 600 एकरात असलेल्या आशियातील झोपडपट्टीसाठी 5,069 कोटींची बोली लावली होती. धारावीत आजच्या घडीला जवळपास 8.5 लाख रहिवासी राहतात.