'ये मावशी तुझ्या पाया पडू का?'...अन् Raosaheb Danve यांनी चक्क हात जोडले!

दानवेंकडे (Raosaheb Danve) एका महिलेने आपलं गाऱ्हाणं मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दानवेंनी थेट हात जोडल्याचं दिसून आलं...

Updated: Oct 21, 2022, 09:56 PM IST
'ये मावशी तुझ्या पाया पडू का?'...अन् Raosaheb Danve यांनी चक्क हात जोडले! title=

Raosaheb Danve : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नुकतेच संभाजीनगरच्या (Sambhajinagar) दौऱ्यावर होते. त्यावेळी दानवेंनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. दानवेंकडे एका महिलेने आपलं गाऱ्हाणं मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दानवेंनी थेट हात जोडल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रास्थानी आल्याचं दिसून आलंय. (raosaheb danve folded hands before a woman who is trying to tell her problem)

एक महिला आपली समस्या मांडण्याचा प्रयत्न करू लागली. यावर  रावसाहेब दानवे यांनी तुझ्या पाया पडू का? असा सवाल करत महिलेला शांत करण्याचा प्रयत्न केला. दोन वेळा सांगितलंय तुला. आणखी काय सांगू, असं रावसाहेब दानवे म्हणाले. तरी देखील महिलेने प्रश्नाचा भडीमार सुरूच ठेवला.

आणखी वाचा - Navneet Rana : नवनीत राणा यांना कोणत्याही क्षणी अटक?, कोर्टाचे पोलिसांना निर्देश

मला बोलू द्या, मला बोलायचं आहे, मला बोलायचा अधिकार आहे. मला माझा प्रश्न मांडायचा आहे, असं महिला बोलत राहिली. त्यावेळी दानवेंनी मावशे थांब आता म्हणत हात जोडले. त्यावर देखील महिलेने लगेच प्रत्युत्तर दिलं. हात जोडू नका, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, असं महिला यावेळी म्हणाली आहे. 

पाहा व्हिडीओ - 

दरम्यान, सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ (Video viral) सध्या तुफान व्हायरल झाल्याचं पहायळा मिळतंय. तर शिवसेनेने दानवेंवर टीकास्त्र सोडल्याचं पहायला मिळतंय. शिवसेनेच्या नेत्या शिल्पा बोडखे यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हात काय जोडता? जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्या, असं त्या यावेळी म्हणाल्या.