आमदार रमेश कदम कॉंग्रेसच्या वाटेवर

चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं..

Updated: Nov 15, 2017, 09:47 AM IST
आमदार रमेश कदम कॉंग्रेसच्या वाटेवर  title=

मुंबई : चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं..

काँग्रेस पक्षामधून राजकीय करिअर सुरू करणाऱ्या रमेश कदम यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण त्यांना कोणतीही जबादारी देण्यात आली नाही.

मूळ राजकारणाचा पिंड असल्यामुळे रमेश कदम भाजपमध्ये खूप अस्वस्थ झाले.अखेर भाजप सोडून त्यांनी काँग्रेसची वाट धरण्याचा निर्णय जाहीर केला.