मुंबई : काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नारायण राणेंना मंत्रीपद देण्यासाठी भाजपमधूनच विरोध होतोय पण भाजप मात्र विविध कारणं शोधत असल्याचं वक्तव्य खासदार हुसेन दलवाई यांनी केलं आहे.
रत्नागिरीत बोलत असताना हुसेन दलवाई यांनी ही माहिती दिली आहे. स्वतंत्र पक्ष स्थापन केलेल्या नारायण राणेंनी एनडीएला पाठींबा दिला आहे. त्यामुळे राणेंना मंत्रीपद मिळणार एवढं नक्की आहे. पण गेले काही दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार लांबलेला आहे. त्यातच शिवसेनेने राणेंना मंत्रीपद देण्यास तीव्र विरोध केला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार हुसेन दलवाई यांनी भाजपसह राणेंवर जोरदार प्रहार केला. भाजप नारायण राणे यांचं जाणीवपूर्वक खच्चीकरण करत आहे. त्यामुळे नारायण राणे यांनी एवढा अपमान सहन करण्यापेक्षा घेतलेल्या निर्णय़ाचा पुर्नविचार करावा असा सल्ला त्यांनी राणेंना दिला...