राऊतांचे चुकीचे ऐकून उद्धव यांनी राष्ट्रवादीसोबत जाऊ नये- आठवले

 'शिवसेनेला मंत्रिपद देणार आहोत सोळा कारण उद्धव ठाकरेंवर आहे आमचा डोळा' अशी कविताही आठवले यांनी केली.

Updated: Nov 3, 2019, 06:00 PM IST
राऊतांचे चुकीचे ऐकून उद्धव यांनी राष्ट्रवादीसोबत जाऊ नये- आठवले title=

मुंबई : राऊतांचे चुकीचे ऐकून उद्धव यांनी राष्ट्रवादीसोबत जाऊ नये असा सल्ला केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी दिला आहे. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ करत असेल तर माझेही शरद पवारांसोबत चांगले संबंध असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी आठवले यांनी आपल्या खास शैलीत 'शिवसेनेला मंत्रिपद देणार आहोत सोळा कारण उद्धव ठाकरेंवर आहे आमचा डोळा' अशी कविताही आठवले यांनी केली.

अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा प्रयोग देशात कुठेच झाला नाही. त्यामुळे शिवसेनेची मुख्यमंत्री पदाची मागणी योग्य नाही. उपमुख्यमंत्री त्यांनी घ्यावं. शिवसेनेच्या जागा जास्त असत्या तर मी स्वतः मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेला पाठिंबा दिला असता असेही आठवले म्हणाले.

भाजपाचे संख्याबळ जास्त असल्याने देवेंद्र फडणवीसचं मुख्यमंत्री होणार असा विश्वास पुन्हा एकदा आठवले यांनी व्यक्त केला. शिवसेना युतीसोबत येईल, त्यांच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि आमच्याशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले. तसेच आमदारांचं संख्याबळ गोळा करण्यात गिरीश महाजन एक्सपर्ट असल्याचेही ते म्हणाले. 

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी राज्य सरकारसोबतचं केंद्रानं देखील मदत करावी अशी मागणी देखील आठवलेंनी यावेळी केली.