पोलिसांनी माकड चेष्टा थांबवावी!, शेतकरी चिडला तर कोणाचं ऐकणार नाही: राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यभर दूध दरवाढीसाठी आंदोलन पुराकरलंय. या आंदोलनातून राज्यातील प्रमुख शहरांचा दूध पुरवठा बंद पाडण्यास सुरुवात झालीय. 

Updated: Jul 16, 2018, 09:45 AM IST
पोलिसांनी माकड चेष्टा थांबवावी!, शेतकरी चिडला तर कोणाचं ऐकणार नाही: राजू शेट्टी title=

सांगली: स्वाभिमानी शेतकरी संघटना दूध आंदोलनादरम्यान पोलीस आमच्या कार्यकत्याना त्रास देत आहेत. पोलिसांनी माकड चेष्टा थांबवावी. शेतकरी चिडला तर मग तो कोणाचं ऐकणार नाही. कितीही पोलीस फोर्स आणि पॅरा मिलटरीफोर्स लावा आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टीं यांनी दिला आहे. इतर राज्यांतून दूध आणून आमचे आंदोलन मोडिस काडण्याची भाषा कोणी करु नये, असंही ते म्हणाले.  सांगली येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आषाढी वारीला मुख्यमंत्र्यांची पूजा रोखणार !

दरम्यान शेतकऱ्यांनी दूध आंदोलन शांततेच्या मार्गानं करावं दुधाची नासाडी करु नये असं आवाहन त्यांनी शेतकरी आणि कर्यकर्त्यांना केलंय. दूधाला भाव दिला नाही तर, आषाढी वारीला मुख्यमंत्र्यांची पूजा रोखणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. दूधाला लीटरमागे पाच रुपये दरवाढ मिळावी अन्यथा आंदोलोन सुरुर रहाणार असल्याचं ते म्हणाले. नामदेव पायरीवर प्रतिकात्मक विठ्ठल रुख्मिमी मुर्तीला दुग्धाभिषेक घालत त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली.

प्रमुख शहरांचा दूध पुरवठा बंद पाडण्यास सुरुवात

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यभर दूध दरवाढीसाठी आंदोलन पुराकरलंय. या आंदोलनातून राज्यातील प्रमुख शहरांचा दूध पुरवठा बंद पाडण्यास सुरुवात झालीय. आज राजू शेट्टी गुजरात राज्यातून येणारं दूध अडवण्यासाठी पालघऱ परिसरात गुजरात सीमेवर स्वता रस्त्यावर उतरणार आहेत.