Rajan Salvi on UddhavThackeray : राजकीय उलथापालथीनंतरही आपण निष्ठावंत राहिलो म्हणून आपल्याला एसीबीची नोटीस आली असा आरोप ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी केलाय. ( Maharashtra News in Marathi ) साळवींना उद्या एसीबी चौकशीला हजर राहण्याचं नोटीस आलीय. आपण जेलमध्ये गेलो तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) यांच्यासोबतच राहू. कोणीही किती काहीही म्हण जेलमध्ये गेलो तरी उद्धव ठाकरेंसोबतच राहू असं साळवी म्हणाले. ( Maharashtra Politics) दबावतंत्रामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
पुन्हा एकदा ठाकरे गटाला अडचणीत आणण्याचा डाव आखण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्याविरोधात लाचलुचपत विभागाने (ACB) चौकशीची नोटीस काढण्यात आली. तसेच आता राजापूर विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनाही एसीबीने चौकशी करण्यासाठी नोटीस जारी केली आहे. ही नोटीस साळवी यांना मिळाली आहे. राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात आहेत. त्यांनाच टार्गेट करण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजन सावळी यांनी मातोश्रीवर जाऊन रिफायनरीबाबत उद्धव ठाकरे यांचे मन वळवण्यासाठी भेट घेतल्याची माहीती आहे. पण उद्धव ठाकरे यांनी रिफायनरीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. त्यातच सावळी हे शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे (sheetal Mhatre) यांच्या भावाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात या हजेरी लावली होती. यावरुन साळवी हे नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र, साळवी यांनी आपली पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली आहे. काहीही झाले तरी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहू, असे म्हटले आहे.
राजापूरचे आमदार राजन साळवी, दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू, विधानपरिषदेच्या आमदार आणि प्रवक्त्या मनिषा कायंदे या तिघांनी शीतल म्हात्रे (sheetal Mhatre) यांच्या भावाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हजेरीनं सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. शीतल म्हात्रे यांचा भाऊ बंटी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जवळचा समजला जातो. त्यामुळे चर्चा रंगली होती.
दरम्यान, रिफायनरीला समर्थन दिल्यावरुन सेना नेतृत्व सध्या राजन साळवींवर नाराज आहे, अशी चर्चा आहे. सुषमा अंधारेंना पक्षात ताकद दिली जात असल्यानं मनिषा कायंदे नाराज असल्याची चर्चा आहे. तर शिंदे गटात गेलेले खासदार गजानन किर्तीकरांचे जवळचे म्हणून सुनील प्रभू यांची ओळख आहे. त्यामुळे ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा डाव डाकल्याची चर्चा सुरु झालेय.