महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी रणनिती! राज ठाकरे यांचा मास्टरप्लान; महायुती आणि महाविकास आघाडीतील 'त्या' उमेदवारांना...

Maharashtra politics :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी रणनिती आखली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Oct 6, 2024, 09:26 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी रणनिती! राज ठाकरे यांचा मास्टरप्लान; महायुती आणि महाविकास आघाडीतील 'त्या' उमेदवारांना... title=

Raj Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे सक्रिय झालीये. पक्ष अध्यक्ष राज ठाकरे राज्यात विविध ठिकाणी जाऊन आढावा घेतायत. एकेकाळचा बालेकिल्ला राहिलेल्या नाशिकमध्येही राज यांनी  दौरा करत आपली ताकद आजमवण्याचा  प्रयत्न केला. 

हे देखील वाचा... महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी करणाऱ्या बच्चू कडूंसोबत मोठा धोका!

मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकवर पुन्हा राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राज ठाकरेंनी कंबर कसलीय. विदर्भ,मराठवाड्याचा दौरा आटोपून राज ठाकरे नाशिक शहरात पदाधिका-यांची बैठक घेतलीय. उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील 47 जागांचा आढावा सध्या राज ठाकरेंनी घेतलाय.  पदाधिका-यांच्या बैठकीत महायुती आणि मविआतील सक्षम पण नाराज उमेदवारांना मनसेत ओढून घेण्याची रणनिती मनसेनं आखलीये.  विस्थापितांना प्रस्थापित होण्यासाठी राज ठाकरेंचा मनसे हा उत्तम पर्याय आहे. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांसाठी मनसे हा चांगला पर्याय असणार आहे. इच्छुकांच्या चाचपणीसाठी राज ठाकरेंचा हा दौरा महत्वाचा मानला जातोय.

हे देखील वाचा... महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक प्रयोग? एमआयएमचा 28 जागांचा प्रस्ताव; शरद पवार म्हणाले...

शिवसेनेत असताना युवा सेनेची जबाबदारी सांभाळत  राज यांनी नाशिकमध्ये आपलं राजकारण विस्तारलं होतं. मनसेच्या स्थापनेनंतर आक्रमक भाषणांवर मोहित होऊन नाशिककरांनी तीन आमदार आणि 40 नगरसेवक मनसेला दिले होते. दरम्यानच्या काळात दोन माजी आमदार आणि बहुतांशी नगरसेवकांनी मनसेला रामराम केलाय. सद्यस्थितीत बोटावर मोजण्याइतपत नगरसेवक मनसेकडे शिल्लक आहेत. इतकच नाही तर सध्याच्या पदाधिका-यांमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे. या सगळ्यातून मार्ग काढत नाशिकमध्ये मनसेचं बस्तान बसवण्याचं आव्हान राज ठाकरेंसमोर असणार आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर जाऊन सप्तश्रृंगी मातेचं दर्शन घेतलंय.. यावेळी राज ठाकरेंसोबत पत्नी शर्मिला ठाकरेही उपस्थित होत्या.. दरवर्षी राज ठाकरे हे दर्शनासाठी गडावर येत असतात.. साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ म्हणून सप्तश्रृंगी गडाची ओळख आहे.. दर्शन घेताना रांगेत असलेले भाविक ओरडायला लागल्यानं राज ठाकरेंनी दर्शन आटोपतं घेतलं..