मी असताना राज ठाकरेंची गरज काय? मनसेला महायुतीत घेण्याबाबत रामदास आठवले यांचे मोठं वक्तव्य

 BJP MNS Alliance : राज ठाकरे यांना महायुतीत घेऊ नका अशी जाहीर भूमिका रामदास आठवले यांनी मांडली आहे. राज ठाकरे यांचे नाव घेत रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्. केले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 26, 2024, 08:01 PM IST
मी असताना राज ठाकरेंची गरज काय? मनसेला महायुतीत घेण्याबाबत रामदास आठवले यांचे मोठं वक्तव्य title=

Ramdas Athwale on Raj Thackeray :  मुंबईतील लोकसभा जागांसाठी भाजप नो रिस्क धोरण राबवणार आहे. यासाठी मनसे भाजप युतीबाबत दिल्लीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीत चर्चा झाल्यानंतर भाजप नेते आशिष शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेऊन 1 तास चर्चा केली. त्यामुळे राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच महायुतीत घटक पक्ष असलेल्या रिपाईचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale ) यांनी मनसेला महायुतीत घेण्याबाबत रामदास आठवले यांचे मोठं वक्तव्य केले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांना महायुतीत घेऊ नका अशी थेट भूमिका रामदास आठवले यांनी मांडली आहे. 

राज ठाकरे हे महाराष्ट्राचे नेते आहेत. पण ते महायुतीमध्ये येणार नाहीत. जर ते आले तरी त्यांना घेऊ नये. ते स्वतंत्र लढ्यामध्येच त्याचा फायदा आहे. त्यांना महायुतीमध्ये घेऊन ही भाजपाला त्याचा काहीच फायदा होणार नाही. मी असताना राज ठाकरे यांची काही गरज नाही असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

भाजपकडून मनसेला महायुतीत सामावून घेण्याच्या हालचाली सुरू

मुंबईतील 6 पैकी 6 लोकसभा जागा जिंकण्याची भाजपची रणनीती आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी महायुती झालीय. मात्र, मुंबईसाठी भाजपनं 'नो रिस्क' धोरण ठरवलंय. राज ठाकरेंच्या मनसेला महायुतीत घेतल्यास मुंबई जिंकता येईल, असा भाजप नेतृत्वाचा कयास आहे. त्यादृष्टीनंच मनसेला महायुतीत सामावून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं समजतंय.

मनसे महायुतीत सहभागी होणार?

गेल्या काही दिवसांत महायुतीचे नेते आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीला साथ दिली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, असं बोललं जातंय. भाजपबाबत मनसेच्या इंजिनाची दिशा नेहमीच बदलत राहिलीय. कधी मोदींचं गुणगान गायचं... तर कधी लाव रे तो व्हिडिओ कॅम्पेन राबवत, मोदींवर आगपाखड करायची, असा मनसेचा राजकीय इतिहास आहे. त्यामुळं मनसेच्या इंजिनाचं अगला स्टेशन... महायुती असणार का, याची चर्चा सुरू झालीय.