मुंबई : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील कारवा वन तळ्यात अजगराने (Python) हरणाची (Deer) शिकार (Hunting) केल्याचा थरारक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वन विभागाने लावलेल्या ई सर्वेलन्स कॅमेऱ्यात या शिकारीचा व्हिडिओ कैद झाला आहे. वन विभागाने जंगलातील हालचालींव लक्ष ठेवण्यासाठी हा व्हिडिओ लावण्यात आला होता. हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहे.
हरणाचे कळप वन तळ्याच्या काठावर पाणी पिण्यासाठी आले होते. यावेळी वन तळ्यात लपून राहिलेल्या अजगराने बेसावध असलेल्या हरणाच्या एका पिल्लावर तळ्यात ओढून घेतंलं. आणि त्याला विळखा घातला. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अजगराने हरणाला विळखा घातला आणि अजगराचा विळखा म्हणजे मृत्यूचा विळखा समजला जातो. या व्हिडिओत ते खरं होताना आपण पाहू शकतो.
हरणाचं कळप पाणी पिण्यासाठी तळ्याजवळ आले होते. व्हिडिओत आपल्याला चार हरणं दिसत आहेत. तीन हरणं पाणी पिअत होते तर एक त्यामागे उभं होतं. यामध्ये एक मोठं हरण असून दोन पिल्ल होती. यामधील एक बेसावध असलेल्या पिल्लाची अजगराने शिकार केली. अजगराने हरणाच्या पिल्लाला विळखा घालून त्याला तळ्यात ओढून घेतलं.
अजगर आपली शिकार करताना पहिल्यांदा त्याला विळखा घालतो. विळखा घालून त्या शिकारने दम सोडल्यावर तो त्याला खातो. वन विभागाने जगंलावर नजर ठेवण्याकरता कॅमेरा लावला होता. त्यामध्ये हा सगळा प्रकार कैद झाला. निसर्गातील हा एक अन्न साखळीचाच प्रकार आहे. प्राणी एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे ते एकमेकांचीच शिकार करताना दिसतात.