डीजेच्या आवाजामुळे पुण्यातल्या तरूणाला बहिरेपण

Pune DJ Sound: सागर मोरे दिसायला धडधाकट मात्र त्याला आता कानाने ऐकू येत नाही.

Pravin Dabholkar | Updated: Sep 25, 2024, 08:24 PM IST
डीजेच्या आवाजामुळे पुण्यातल्या तरूणाला बहिरेपण title=
डीजेमुळे पुण्यातल्या तरूणाला बहिरेपण

Pune DJ Sound: सध्या सणासुदीला, तसेच गणेश विसर्जन सारख्या मिरवणुकीत डीजे लावून नाचण्याचा ट्रेण्ड जोरात आहे. पण डीजेचा आवाज आपल्या कानांना किती त्रासदायक होतो, याची जाणिव फार कमी जणांना असते. डीजेच्या आवाजामुळे बहिरेपण येऊ शकते, याची जाणिव आपल्याला श्रवण क्षमता कमी झाल्यावर होते. पुण्यात असाच एक प्रकार समोर आलाय. ज्याच डीजेच्या आवाजामुळे एका तरुणाला आपली श्रवण क्षमता गमवावी लागली आहे. कोणासोबत आणि कसा घडला हा प्रकार? सविस्तर जामून घेऊया. 

सागर मोरे दिसायला धडधाकट मात्र त्याला आता कानाने ऐकू येत नाही.डीजेचा दणदणाट याच कारण ठरलाय. पुण्यात गणपती विसर्जन चौकात चार डीजे एकत्र आले आणि या चारही डीजेंच्या मधोमध सागर आवाज वाढव डीजे असं म्हणत नाचण्याचा आनंद घेत होता. डीजेच्या दणदणाटामुळे अमोल मोरेच्या कानांवर आघात झाला आणि एकाएकी त्याला ऐकू यायचं बंद झालं. 

श्रवण क्षमता झाली कमी 

उपचारादरम्यान डॉक्टरने सागरच्या उजव्या कानाची श्रवण क्षमता 60 टक्के तर डाव्या कानाची 95 टक्के कमी झाल्याचं सांगितलं. हल्ली सर्वदूर डीजेचं फॅड वाढलंय.लग्न कार्य असो किंवा मग विसर्जन मिरवणूक.तिथे डीजे पाहिजेच. डीजेच्या याच दणदणाटामुळे बहिरेपणाही येऊ शकतो. 

मानवी कांनाची ऐकण्याची क्षमता 

एका ठराविक डेसिबलपर्यंत आवाज ऐकण्याची क्षमता मानवी कानांची असते. तरीही मिरवणुकीत तरुण बेफामपणे कुठलाच विचार न करता क्षणिक आनंदासाठी डीजे समोर उभे राहून नाचताना दिसतात. मात्र त्याचा परिणाम घातक ठरतो.

बहिरेपणाच्या तक्रारी वाढल्या 

मोठा आवाज सतत कानावर पडल्याने बहिरेपणाच्या तक्रारी वाढल्या आहेत. तरीही बोलाव माझ्या डीजेला म्हणत तरुणाई ठेका धरते.. मात्र सागर मोरेची ही अवस्था पाहून डीजेपासून आपण किती लांब राहावं याचा विचार आता तरी प्रत्येकाने करायला पाहिजे.