Khopoli Zenith Waterfall : मुंबई, ठाण्यासह रायगड जिल्ह्यात तुफान पडत आहे. अशातच खोपली येथील झेनीथ वॉटरफॉलजवळ थरारक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चौघेजण धबधब्याच्या प्रवाहात अडकले होते. यातील एक तरुणी वाहून गेली आहे. तरूणीचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.
रायगड जिल्हयाच्या खोपोली परीसरात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे येथील धबधब्यांमधील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. झेनीथ धबधब्याजवळ एक तरूणी वाहून गेली. तिचा मृतदेह शोधण्यात स्थानिक बचाव पथकाला यश आलंय.
खोपोलीच्या दत्तमंदिर मठाजवळ झेनीथ धबधब्याच्या प्रवाहातून पलीकडे येताना खोपोलीतील येथील एकाच कुटुंबातील चारजण अडकले होते. त्यातील एक तरुणी वाहून गेली. सोबतच्या नातेवाईकानी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. यातील दोन महिला व एक युवक असे तिघे बचावले. वाहून गेलेल्या तरूणीचा मृतदेह पेपको कंपनीच्या पुलाजवळ सापडला.
दोन दिवसांपूर्वी रायगड किल्ल्याच्या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. त्यामुळे रस्त्यांना नद्यांचं स्परूप प्राप्त झालं होतं. या गुडघाभर पाण्यात चारचाकी वाहने अडकून पडली तर एक मोटार सायकल वाहून गेली. आजच्या पावसाने परिसरात भीतीचं वातावरण होतं.
राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय, तर नाशिक, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केलाय.उर्वरित महाराष्ट्राला यलो अलर्ट दिलाय.वादळी वारे, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय... सकाळपासून मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर आहे.