पुण्यातील 'या' भागात बिबट्याचा धुमाकूळ; तब्बल दोन तासानंतर...; पाहा VIDEO

Pune Leopard Video: वन विभागाची रेस्क्यू टीम (Rescue Team of Forest Department) यांच्यासह वारजे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर त्याला पकडण्यात यश आलंय. 

Updated: Mar 20, 2023, 06:01 PM IST
पुण्यातील 'या' भागात बिबट्याचा धुमाकूळ; तब्बल दोन तासानंतर...; पाहा VIDEO title=
Pune News Leopard

Leopard Spotted again in Pune: दोन दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढवे धावडे येथील एका सोसायटीच्या परिसरात बिबट्या (Leopard spotted In Warje) दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. त्याआधी देखील पुण्यातील काही भागात बिबट्याचा वावर दिसत होता. अशातच आता पुणे शहर (Pune News) परिसरातील वारजे जवळच असलेल्या न्यू अहिरे परिसरात (New Ahire Area) बिबट्याचा वावर आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. 

न्यू अहिरे गावातील एका नवीन बांधकाम सुरू असलेल्या निर्माणाधित इमारतीत बिबट्या शिरला. सकाळी काही लोकांना बिबट्या दिसून आला. त्यानंतर मोठा गोंधळ उडाल्याचं दिसून आलं. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना (Pune Police) कळवलं. पोलिसांच्या वन विभागाला (Forest Department) माहिती दिली.

वन विभागाची रेस्क्यू टीम (Rescue Team of Forest Department) यांच्यासह वारजे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर त्याला पकडण्यात यश आलंय. वन विभागाचे कर्मचारी बिबट्याला दार्ट मारून बेशुद्ध करून घेऊन गेले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती.

पाहा VIDEO -

दरम्यान, वनविभागाचे अधिकारी व रेस्क्यू टीमने या बिबट्याला जेरबंद (Leopard jailed) केलं. काळ नेरे, जांबे आणि कासारसाई, त्याचबरोबर मांजरी, केशवनगर, लोणी काळभोर या भागात देखील बिबट्यांचा वावर दिसून येतोय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण दिसून येतंय.

काही दिवसांपूर्वी, आयटी सिटी अशी ओळख असलेल्या हिंजवडीलगत एक पाय निकामी असलेल्या बिबट्याने शिकार केल्याचा व्हिडीओ समोर आला. हा थरारक हल्लाच्या व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद (CCTV VIDEO) झाला होता. त्याचबरोबर पुण्यातील चाकण एमआयडीसीमध्ये पहाटे बिबट्या आढळल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला होता.