Kolhapuri Chappal: नादखुळा! वारसा जपत पुण्यातील कुटुंबियांनी बनवली 5 फूटांची कोल्हापूरी चप्पल

कोल्हापूरची चप्पल आपल्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते. आपल्याला कायमच असं वाटतं राहतं की आपल्याकडेही एक कोल्हापूरी चप्पल (Kolhapuri Chappal) असावी. कोल्हापूरी चप्पलेचं सौंदर्य सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतं. त्याचसोबत सामान्य माणसांना तसेच कलाकरांनाही असंच वाटतं राहतं की आपणंही अशीच एक चप्पल तयार करावी. 

Updated: Jan 14, 2023, 12:24 PM IST
Kolhapuri Chappal: नादखुळा! वारसा जपत पुण्यातील कुटुंबियांनी बनवली 5 फूटांची कोल्हापूरी चप्पल title=

हेमंत चापुडे, झी माीडिया, पुणे: कोल्हापूरची चप्पल आपल्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते. आपल्याला कायमच असं वाटतं राहतं की आपल्याकडेही एक कोल्हापूरी चप्पल (Kolhapuri Chappal) असावी. कोल्हापूरी चप्पलेचं सौंदर्य सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतं. त्याचसोबत सामान्य माणसांना तसेच कलाकरांनाही असंच वाटतं राहतं की आपणंही अशीच एक चप्पल तयार करावी. पुण्यातील अशाच एका परिवारानं आपल्या आजोबांचा वारसा जपत पाच फूट आणि साडेबावीस किलो वजनाची कोल्हापूरी चप्पल (Trending News) तयार केली आहे. ही कोल्हापूरी चप्पल सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते आहे. (Pune news a family from pune makes 22.5 kilo and 5 foot long kolhapuri chappal)

हौसेला मोल नसते असं म्हणतात आणि याचाच प्रत्यय जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे आला असून प्रकाश उर्फ बाळासाहेब हिरे (Hire Family) यांनी छंद म्हणून चक्क 5.5 फुटी उंचीच 22.5 किलो वजनाची कोल्हापुरी पध्दतीची चप्पल बनवली असून आपल्या कलाकुसरीने, हाताने तयार केलेली चप्पल बनवण्यासाठी त्यांना 45 दिवसांचा कालावधी लागला असून 20 हजार रूपयांपर्यंतचा खर्च आला आहे.

चप्पल बनवण्यासाठी त्यांना पत्नी, मुले, वडील यांचे सहकार्य लाभले असून ओरिजनल चमद्याची कोल्हापुरी चप्पल त्यांनी बनवली आहे. आपली चर्मकार समाजाची कला जोपासण्यासाठी आणि आपल्या आजोबांचा वारसा (स्वर्गीय खंडू धोंडिबा हिरे आणि कंपनी) जपण्यासाठी बनवलेली कोल्हापुरी चप्पल ओतूर (Local to Global Market) बाजार पेठेत सर्वांचेच लक्ष वेधून घेते. 

कुटुंबिंय काय म्हणाले? 

आपल्या आजोबांचा वारसा आणि वडिलोपार्जित व्यवसाय पुढे जावा म्हणून आम्ही दोन महिन्यांमध्ये ही चप्पल घरच्याघरी तयार केली आहे. यासाठी माझ्या आज्जींपासून, माझे बाबा, पत्नी आणि माझ्या लहान मुलानंही हातभार लावला असल्याचे चप्पल बनवणाऱ्या प्रकार हिरे यांनी नमूद केले. त्यांच्या या कामामुळे त्यांच्या परिसरातील लोकांनाही गर्व वाटतो आहे. कोल्हापूरी चप्पलेचा (Pune) हा नाद पुण्यातही पाहून पुणेकरांनाही त्याचे अप्रुप वाटते आहे. या बातमीनं सध्या सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. 

कोेल्हापूरी चप्पलचं वाढतं महत्त्वं

कोल्हापूरी चप्पल आता फक्त महाराष्ट्रापुरतीच नाही किंवा फक्त देशातच नाही तर जगभरात विकली जाते. या चप्पलेची क्रेझ ही जगभरात आहेत. अनेक तरूण या चप्पलांना ग्लोबल करण्यासाठी नवे स्टार्टअप्सही उभारत आहेत. त्यामुळे या चप्पलेला जागतिक बाजारपेठेतही (Marathi News) खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. सध्या या चप्पलेला तयार करण्यासाठीही अनेक पुढच्या पिढीतील कारगीर तयार होत आहेत. त्यामुळे या चप्पलेला लोकल टू ग्लोबल म्हत्त्व प्राप्त झालं आहे.