पुणे-मुंबई एक्सप्रेसवरील अपघातात दोघांचा मृत्यू

पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झालाय. तर  8 जण जखमी झालेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 16, 2017, 04:13 PM IST
पुणे-मुंबई एक्सप्रेसवरील अपघातात दोघांचा मृत्यू  title=

मुंबई : पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर झालेल्या भीषण अपघाता दोन जणांचा मृत्यू झालाय. तर  8 जण जखमी झालेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या खाजगी बसने बोरज गावाजवळ भरधाव ट्रक ची मागून जोरदार धडक दिली. त्यात बसमधले २ प्रवासी ठार झाले आहेत.
अपघातात एकूण आठ प्रवासी जखमी आहेत.

त्यापैकी ३ प्रवासी गंभीर तर ५ प्रवासी किरकोळ  जखमी आहेत. उपचारासाठी जखमींना निगडी येथील लोकमान्य हॉस्पिटल या खाजगी रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. वाहतूकीचे नियम पाळण्याचे आवाहन वारंवार वाहतूक विभागाकडून केले जात असते. पण त्याला न जुमानता बेदारकपणे गाड्या चालविणे सुरूच असते. यातून अनेकांचे संसार उद्धस्त होत असले तरीही यातून अनेकजण काहीच धडा घेत नाहीत.