पुणे मेट्रो-३ प्रकल्प : हिंजवडीची वाहतूक कोंडीतून सुटका होणार?

हिंजवडीतल्या राजीव गांधी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या सुमारे अडीच लाख कर्मचाऱ्यांना या मेट्रो मार्गामुळे मोठा दिलासा

Updated: Dec 18, 2018, 10:48 AM IST
पुणे मेट्रो-३ प्रकल्प : हिंजवडीची वाहतूक कोंडीतून सुटका होणार? title=

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पुण्यातील मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचं भूमीपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर असा हा मार्ग असणार आहे. पीएमआरडीए म्हणजेच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. हिंजवडीतील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पार्कसह परिसरातील उद्योगांना या प्रकल्पामुळे चालणा मिळणार आहे. त्याचप्रमाणे या भागातील वाहतूक कोंडी फुटण्याच्या दृष्टीकोनातून हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.

पुणे मेट्रो ३ प्रकल्पाची वैशिष्ट्ये

- मेट्रो मार्गाची लांबी - २३.३ किमी

- एकूण स्थानके - २३

- प्रकल्पाचा खर्च - ३ हजार ३१३ कोटी

- पूर्णत्वाचा कालावधी - ३ वर्षे

- आठ डब्यांच्या २ मेट्रो धावणार

- एकाच वेळी ३३ हजार प्रवासी वाहतूक

- रोजगार निर्मिती - १ हजार

हिंजवडीतल्या राजीव गांधी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या सुमारे अडीच लाख कर्मचाऱ्यांना या मेट्रो मार्गामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. पीएमआरडीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात येतोय. बालेवाडीच्या शिवछ्त्रपती क्रीडा संकुलात भूमीपूजनाचा कार्यक्रम होतोय. पुण्याचे पालकमंत्री गिरिश बापट यांनी स्वत: या कार्यक्रमाच्या तयारीची जबाबदारी सांभाळलीय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाजपकडून मोठं शक्तिप्रदर्शन होणार असल्याची चर्चा आहे.