दुसऱ्याच्या पत्नीसोबत 'लिव्ह इन' मध्ये राहत होता; तोंडाला रुमाल बांधून नवरा आला अन् पुढच्या क्षणी....

Pune Crime News: आपल्या पत्नीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचा हा राग हल्ला करणाऱ्या पतीच्या मनात होता. या रागातून त्याने संबंधित व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 17, 2023, 01:47 PM IST
दुसऱ्याच्या पत्नीसोबत 'लिव्ह इन' मध्ये राहत होता; तोंडाला रुमाल बांधून नवरा आला अन् पुढच्या क्षणी.... title=

Pune Crime News Today: दुसऱ्याच्या पत्नीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणे एका इसमाला चांगलेच महागात पडले आहे. महिलेच्या पतीला कळताच त्याने लोखंडी हत्यार घेऊन त्याच्यावर वार करायला सुरुवात केली. हडपसरमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसरमध्ये पत्नीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. आपल्या पत्नीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचा हा राग हल्ला करणाऱ्या पतीच्या मनात होता. या रागातून त्याने संबंधित व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला. 

हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. ससाणे नगर येथील ओम साई व्हिडिओ गेम अँड पोकर झोन येथे 15 जुलै च्या रात्री हा प्रकार घडला. यासंदर्भात हडपसर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. तसेच पुढील तपास सुरु आहे.

लोखंडी वस्तूने हल्ला केल्याप्रकरणी अमोल संदिपान गायकवाड (वय 34) विरोधात हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हल्ला झाल्यानंतर सुशांत बाळासाहेब चव्हाण (वय 26) या तरुणाने पोलिसात तक्रार दाखल केली होती. 

अमोल संदिपान गायकवाड याची पत्नी सुशांत चव्हाण या तरुणासोबत मागच्या दीड वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे वृत्त समोर आले आहे. हाच राग मनात धरुन अमोल गायकवाडने सुशांत चव्हाणवर प्राणघातक हल्ला केला. सुशांत हा त्याच्या दुकानात असताना अमोल तेथे तोंडाला रुमाल बांधून आणि डोक्यावर टोपी घालून आला. त्याच्या हातातील लोखंडी हत्यार होत्या. हातातल्या हत्याराने त्याने सुशांतचे डोके, कान आणि हातावर वार केले. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.