सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: सध्या अनेक गंभीर घटना घडताना समोर येत आहेत. त्यातून हल्ली बलात्काराच्या (Pune rape case) घटना वाढताना दिसत आहेत. नुकतीच एका अशा घटनेनं खळबळ माजवून दिली आहे. एका महिलेला एका अज्ञात व्यक्तीनं घरी बोलावलं आणि तिला गुंगीचं औषधं (medicine) देऊन सरळ तिच्यावर बलात्कार केला. पुण्यात भर दिवसा असा प्रकार घडल्यानं सगळीकडूनच राग व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं तक्रार दाखल केली असून या व्यक्तीवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीनं आधी पीडित महिलेला घरी बोलावलं आणि मग कॉफीतून गुंगीचं औषध देत तिच्यावर जबरदस्तीनं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील (pune) या घटनेनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे. (Pune Crime Man Called Women at Home and Raped incident in Kharadi Pune Maharashtra Crime)
हॉटेल व्यवसायाची चर्चा करण्याच्या बहाण्यानं एका 36 वर्षीय महिलेला घरी बोलावलं आणि घरी आल्यानंतर कॉफीमध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. पुण्याच्या खराडी परिसरात ही घटना घडली आहे. यासाठी चंदननगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजयसिंग विजयसिंग ठाकूर (वय 31) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने (victim) याप्रकरणी तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला केटरिंगचा व्यवसाय करते. तिची आणि आरोपीची ओळख कॉमन मित्राच्या माध्यमातून झाली होती. करोना काळात व्यवसाय बंद पडल्याने आरोपी कामाच्या शोधात होता. त्यावेळी त्याच्या एका मित्रानं फिर्यादी महिलेचा मोबाईल क्रमांक त्याला दिला होता. यातून दोघांची ओळख झाली होती. एकत्र हॉटेल व्यवसाय (Hotel Business) करायचा असे दोघांचे ठरले होते. दरम्यान 3 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास आरोपीनं या महिलेला हॉटेल व्यवसायाची चर्च करूयात असे सांगून घरी बोलावले आणि घरी आल्यानंतर कॉफीमध्ये गुंगीचे औषध साधून फिर्यादी यांच्यावर पाशवी बलात्कार केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ही महिला (Female) तिथून निघून आली. त्यानंतर तिनं अखेर चंदननगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रा दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू झाला आहे.
सध्या असे प्रकार वाढू लागले असल्याने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातून अनोळखी माणसं आणि मग त्यातून होणारी डेटिंग, मैत्री होणं याची आता खबरदारी खुद्द महिलांनी घेणे आवश्यक झाले आहे.