Aditya Thackeray : '32 वर्षांच्या तरुणाने खोके सरकारला...' दिशा सालियन आरोपावरुन आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

घोटाळेबाजा, गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न, आदित्य ठाकरे यांचं सत्ताधाऱ्यांना उत्तर, तर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एसआयटी चौकशीचे आदेश

Updated: Dec 22, 2022, 05:04 PM IST
Aditya Thackeray : '32 वर्षांच्या तरुणाने खोके सरकारला...' दिशा सालियन आरोपावरुन आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर title=

Disha Salian Death Case : खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) A U नावाने 44 फोन आले होते, हा A U म्हणजे आदित्य-उद्धव (Aditya-Uddhav Thackeray) असल्याची बिहार पोलिसांनी (Bihar Police) माहिती दिल्याचा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला होता. या प्रकरणाचे पडसाद आज हिवाळी अधिवेशनातही (Winter Session) उमटले. 

विरोधकांनी केली चौकशीची मागणी
दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogowale) आणि भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) केली. दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या पार्टीत कोण कोण होतं? पार्टीत मंत्री कोण होता? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी केलीय.

एसआयटीमार्फत चौकशी करणार
त्यानंतर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची (Disha Salian Death Case) एसआयटी (SIT) मार्फत केली जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली आहे. याप्रकरणात पोलीस तपास सुरु आहे, ज्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनी पुरावे द्यावेत असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

आदित्य ठाकरे यांनी केला टीका
विरोधकांनी केलेल्या आरोपांवर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गेल्या अडीच वर्षात असं हाऊस चालताना मी कधीच पाहिलं नाही, सत्ताधारी पक्षच व्हेलमध्ये आंदोलन करतंय, हे आतापर्यंत कधी झालं नव्हतं. आम्ही राज्यपाल हटावची मागणी करत आहोत, त्यांना वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा हा प्रयत्न आहे. घोटाळेबाज, गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचवण्याचा हा प्रयत्न आहे. एनआयटीचा जो घोटाळा आहे, तो आम्हाला हाऊसमध्ये काढू देत नाहीएत, त्यासाठी हे सर्व सुरु आहे. 32 वर्षाच्या तरुणाने या खोके सरकारला हलवून ठेवलंय असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

हे ही वाचा : आताची मोठी बातमी! Disha Salian मृत्यू प्रकरणाची चौकशी SIT मार्फत केली जाणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टची मागणी
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा अशी मागणी भाजप आमदार नितेश राणेंनी केली आहे. सुशांत सिंग, दिशा सालियान प्रकरण समोर येतं तेव्हा आदित्य ठाकरेंचेच नाव का घेतले जाते? असा सवाल उपस्थित करत दाल मे कुछ काला है असं राणे म्हणालेत. तर ए फॉर आदित्य म्हणत शेवाळेंच्या आरोपांना राणेंनी दुजोरा दिलाय. तसंच मुंबई पोलिसांनी दिशा सालियन केस रिओपन करावी अशी मागणी त्यांनी केलीय. नितेश राणेंपाठोपाठ बडनेराचे आमदार रवी राणाही आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टची मागणी केलीय.