सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी दिवसभरात केलेल्या कारवायांमध्ये तब्बल 600 किलो पेक्षा अधिक मेफॅड्रोनचा साठा (Mephedrone Drugs) जप्त करण्यात आला आहे. 1100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे मेफेड्रोन पोलिसांनी (Pune Police) जप्त केलंआहे. विश्रांतवाडी इथल्या भैरवनगरमध्ये असलेल्या एका गोदामामधून 55 किलो, कुरकुंभ एमआयडीसीमधील ( MIDC) एका फॅक्टरीमधून 500 किलोच्या आसपास साठा करून ठेवण्यात आलेला होता. या ठिकाणी एमडीची निर्मिती केली जात होती.
अटक केलेल्या तिघा आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार या मेफेड्रोनची निर्मिती दौंड इथल्या कुरकुंभ मधील एका कारखान्यामध्ये केली जात असल्याचे देखील समोर आले आहे. आतापर्यंत तब्बल 1 हजार 100 कोटी रुपयांचे एमडी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीय.
असा झाला खुलासा
अकराशे कोटी रूपयेच्या ड्रग्जप्रकरणी पुणे पोलिसांनी वैभव उर्फ पिंट्या भारत माने, अजय अमरनाथ करोसिया (वय 35) आणि हैदर नूर शेख (वय 40, रा. विश्रांतवाडी) यांना अटक केली होती. त्यांच्याकडे ड्रग्जची पोती घेऊन आलेल्या टेंपोच्या चालकांकडे चौकशी केल्यानंतर कुरकुंभच्या कारखान्याची माहिती पोलिसांना मिळाली. या कारखान्यामध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला असून तिथे पोलिसांना तब्बल पाचशे किलो मेफेड्रॉन मिळून आलंय .
मुंबईमधील पॉल आणि ब्राऊ नावाच्या दोन ड्रॅग पेडलर अर्थात ड्रग्ज विक्रेत्यांची माहिती पोलिसांच्या हाती लागलेली आहे. पुण्यात जप्त केलेले मेफेड्रोन या दलालांमार्फत संपूर्ण देशभरामध्ये आणि विदेशात वितरित केलं जाणार होतं. त्या दोघांच्या शोधासाठी गुन्हे शाखेची पथके मुंबई आणि दिल्लीला रवाना करण्यात आलेली आहेत. हैदर याने भाड्याने घेतलेल्या विश्रांतवाडी मधील या गोदामामध्ये मीठ आणि रांगोळीचा साठा करून ठेवण्यात आलेला होता. पांढऱ्या क्रिस्टल्स प्रमाणे दिसणारे मेफेड्रोन हे छोट्या छोट्या पाकिटांमध्ये भरून ही पाकिटे मिठाच्या मोठ्या पाकिटांमध्ये लपवली जात होती
कुरकुंभमध्ये एमडीचा साठा जप्त
कुरकुंभमध्ये केलेल्या कारवाईत 550 किलो एमडी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन केमिकल एक्सपर्ट ताब्यात घेतले आहेत. या कंपनीच्या अनिल साबळे नावाच्या मालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही फार्मसुटीकल कंपनी आहे. याठिकाणी औषधांची निर्मिती केली जात होती. ॲाक्टोबर 2023 पासून इथे मेफोड्रेनची निर्मिती केली जात असल्याच तपासात समोर आलंय. गुन्हे शाखा आणि पुणे पोलिसांच्या विविध पथकांनी देशभरातील विविध शहरांमध्ये छापेमारी सुरु केली आहे. राज्याबाहेर देखील मोठ्या प्रमाणावर छापे टाकले जात आहेत. त्याकरिता केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेतली जात असल्याचे आयुक्तांनी सांगितले
पुणे पोलिसांच्या या कारवाईने देशभरातल्या एजन्सीजच लक्ष वेधल गेलंय. इतक्या मोठ्या प्रमाणावर क्लासिफाईड ड्रग मिळाल्याने ललित पाटील प्रकरण घडून गेल्यानंतरही पुणे ड्रग्जकॅपिटल बनल असल्याच समोर आलंय .
आतापर्यंत काय-काय घडलंय
पुणे ड्रग्स प्रकरणात आत्तापर्यंत एकूण 5 आरोपीना अटक करण्यात आली आहे. ड्रग्स प्रकरणात पुणे पोलिसांकडून देशातल्या विविध शहरांमधून या 5 जणांना पोलिसांनी अटक केली. पुण्यातून हैदर शेख आणि वैभव माने तर दिल्लीतून तीन जणांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. आत्तापर्यंत 2 हजार किलो पेक्षा अधिक ड्रग्स पुणे पोलिसांनी जप्त केलंय.