Navale Bridge Accident Pune : पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात

पुण्यातील नवले पूलावरील(Navale Bridge Accident Pune) अपघातांची मालिका सुरुच आहे.

Updated: Nov 22, 2022, 05:33 PM IST
Navale Bridge Accident Pune : पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात title=

Navale Bridge Accident Pune : पुण्यातील नवले पुलावर अपघातांचं सत्र सुरूच असलेलं पाहायला मिळत आहे. रविवारी रात्री झालेल्या अपघातानंतर दुसऱ्या दिवशीही अपघात झाले होते. आज मंगळवारी पुन्हा एकदा एक अपघात झाल्याचं समोर आलं आहे. कात्रजवरून हा कंटेनर मुंबईच्या दिशेने चालला होता. भरधाव वेगात असणारा कंटेनर रस्त्याच्या मधील असणाऱ्या दुभाजकावर जाऊन धडकला आहे. दरम्यान या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झालीय. सातत्याने होणाऱ्या या अपघातांमुळे पुणेकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. (Navale Bridge Accident Pune latest marathi News)

सुप्रिया सुळेचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

दरम्यान पुणे, मुंबई-बंगळुरू महामार्गावर नवले पूल परिसरात सातत्याने होणाऱ्या अपघातांबाबात राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे. पुणे, मुंबई-बंगळुरू महामार्गावर असलेल्या नवले पूल परिसरात सातत्याने अपघातांची मालिका सुरु आहे. याबाबत सुळे यांनी कायमस्वरूपी तोडगा आणि रस्ता सुरक्षेबाबत चर्चेसाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय अंतर्गत जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलवण्यात यावी, अशी मागणी केलीय.

संबंधित बातम्या

पुण्यातील नवले पूलावर तब्बल 48 वाहनांचा अपघात; तपासात धक्कादायक खुलासा