Diwali 2022 : महागाईचा भस्मासूर आता प्रवासाच्या सुखसोयींपर्यंतही पोहोचला आहे. दिवाळीत अनेक गोष्टींचे दर वाढणार असून, त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशावर याचे परिणाम होणार असंच सांगण्यात येत होतं. त्यातच आता एक नवी माहिती समोर आली आहे. तिथे (ST) एसटीची हंगामी भाडेवाढ होणार असतानाच आता प्रवासाच्या दुसऱ्या वाटांवर जाण्यासाठीही जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
खासगी ट्रॅव्हल्स (Private Travels) कंपन्या मोठ्या प्रमाणात लुटमार करत असल्यामुळं दिवाळीत खर्चाची आणखी एक फोडणी तुम्हाला सोसावी लागणार आहे. (Diwali 2022) दिवाळीमुळे खासगी ट्रॅव्हल्सनं प्रवासी भाड्यात दुप्पट, तिप्पट वाढ केली आहे. दिवाळी निमित्त एसटी आणि रेल्वेचं बुकिंग हाऊसफुल्ल झालं आहे. परिणामी अपेक्षित स्थळी पोहोचण्यासाठी अनेकजण खासगी बस, किंवा तत्सम सोयींचा पर्याय निवडू लागले आहेत.
नागरीक खासगी ट्रॅव्हल्सकडे वळू लागलेले असचानाच याचा गैरफायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सनं मनमानी करण्यास सुरुवात केली आहे. या लुटमारीकडे पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभाग दुर्लक्ष करत असल्याची बाब समोर आल्यामुळे नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली. गेल्या दोन ते तिन दिवसांपासून अचानकपणे ही दरवाढ करण्यात आलीये. त्यामुळे प्रवासासाठी नागरिकांचे हजारो रुपये खर्च होत आहेत...
प्रवासी भाडं नेमकं किती फरकानं वाढलंय पाहा...
शहर | आठवड्यापूर्वीचे दर | नवे दर |
पुणे- नागपूर | 1700- 2000 | 4500-5000 |
पुणे- अमरावती | 1500-1800 | 3600- 4500 |
पुणे-लातूर | 800-1000 | 1700-1900 |
पुणे- नांदेड | 800-1000 | 2100-2699 |
पुणे-जळगाव | 700-900 | 2100-2600 |
पुणे-औरंगाबाद | 600-900 | 1500-2000 |