अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या पोलिसांच्या गाडीला अपघात

मुंबई - नाशिक महामार्गावर पोलीस व्हॅनला झालेल्या अपघातात दोन जण जखमी झालेत.

Updated: Jun 23, 2017, 01:11 PM IST
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या पोलिसांच्या गाडीला अपघात title=

नाशिक : मुंबई - नाशिक महामार्गावर पोलीस व्हॅनला झालेल्या अपघातात दोन जण जखमी झालेत.

रस्त्यावर झालेल्या एका अपघातातील जखमींना घेऊन ही पोलीस व्हॅन हॉस्पीटलकडे निघाली होती. पंरतु, जखमींना हॉस्पीटलमध्ये पोहचवण्याआधीच मुंबई-नाशिक महामार्गावरील राणेनगर परिसरातील उड्डाण पुलावर या पोलीस व्हॅनला अपघात झाला.


अपघातग्रस्त पोलीस व्हॅन

समोरून भरधाव वेगानं येणाऱ्या एका ट्रकनं अंबड पोलीस व्हॅनला उडवलं. या अपघातात सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह दोन कर्मचारी जखमी झालेत. 

शुक्रवारी पहाटे हा अपघात झाला. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.