नारायण राणेंच्या होर्डिंग्जवरून 'काँग्रेस' गायब!

आज सिंधुदुर्गात होत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा ऊत आलाय.

Updated: Jun 23, 2017, 12:09 PM IST
नारायण राणेंच्या होर्डिंग्जवरून 'काँग्रेस' गायब! title=

सिंधुदुर्ग : आज सिंधुदुर्गात होत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा ऊत आलाय.

कणकवलीत कार्यक्रमाच्या  निमित्तानं लावण्यात आलेल्या होर्डिंगवर काँग्रेसचा उल्लेखही नाही. शिवाय नारायण राणेंच्या नावाखाली माजी मुख्यमंत्री आणि विधानपरिषद सदस्य एवढाच उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे गडकरी, फडणवीस यांच्या उपस्थितीत राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा जोर धरतेय.

विशेष म्हणजे नारायण राणेंच्या नव्या राजकीय कारकिर्दीची मूर्हुतमेढ रोवली जाण्याची शक्यता असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही कणकवलीत येत आहेत.

दरम्यान, नारायण राणे भाजपसाठी अस्त्र ठरू शकत नाहीत तर ती ओढवून घेतलेली ब्याद असेल, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.