औरंगाबादच्या उपायुक्तांना मारहाण करणाऱ्या आरोपींला अटक

संतप्त नागरिकाने केली होती उपायुक्तांना मारहाण

Updated: Jun 22, 2018, 05:53 PM IST
औरंगाबादच्या उपायुक्तांना मारहाण करणाऱ्या आरोपींला अटक title=

औरंगाबाद : महापालिकेचे उपायुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना मारहाण कराण्यात आली. याप्रकरणी मारहाणीबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी नारायण गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. महापालिका अधिका-यांची चुक असल्यानंच मारहाण केल्याचं आरोपीने सांगितलं. नाल्यात माणूस वाहून गेला त्या ठिकाणची पाहणी करायला भालसिंग आले होते. त्यावेळी संतप्त नागरिकांनी भालसिंगांना मारहाण केली. नाल्यात वाहून गेल्यानं एका युवकाचा मृत्यू झाला. बजरंग चौक परिसरात ही दुर्घटना घडली. चेतन चोपडे हा 38 वर्षीय युवक नाल्यात पडला होता. रात्री पावसामुळं नाला दुथडी भरून वाहत होता. रस्त्याच्या शेजारीच नाला असल्याने त्याला अंदाज आला नाही आणि त्याच्या बुलेट गाडीसह तो नाल्यात पडला होता.