विजेचा शॉक लागून सासू सुनेचा मृत्यू

सुनेला वाचवायला गेलेल्या सासूचाही मृत्यू

Updated: Jun 22, 2018, 05:43 PM IST
विजेचा शॉक लागून सासू सुनेचा मृत्यू title=

यवतमाळ : विजेचा शॉक लागून सासू सुनेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मारेगाव तालुक्याच्या कुंभा येथील ही घटना आहे. कपडे वाळू घातलेल्या तारेत विद्युत प्रवाह सुरु होता. सून सुनीता मोहुर्लेला वाचवायला गेलेल्या सासू शकुंतला मोहुर्ले यांचाही हा घटनेत मृत्यू झाला आहे.