'नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची झलक', पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! म्हणतात, 'जो समुद्रावर नियंत्रण ठेवू शकतो...

PM Modi in Sindhudurg : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं (chhatrapati shivaji maharaj statue) झालं आहे. बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नौसेनेचं कौतूक करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं.   

सौरभ तळेकर | Updated: Dec 4, 2023, 07:51 PM IST
'नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची झलक', पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! म्हणतात, 'जो समुद्रावर नियंत्रण ठेवू शकतो... title=
PM Narendra Modi on Sindhudurg Daura

PM Modi in Sindhudurg Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं झालं आहे. दरवर्षी ४ डिसेंबरला साजरा होणारा नौदल दिन यावर्षी जिल्ह्यात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने साजरा होत आहे. याच नौसेना दिनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित लावली. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि इतर मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौसेनेचं कौतूक करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. 

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

नौदल कुटुंबातील सर्व सदस्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. या सिंधुदुर्ग किल्ल्यावरून नौदल दिनाच्या शुभेच्छा देण्याचे भाग्य मला लाभलं. छत्रपती शिवाजी महाराजांना समुद्राच्या सामर्थ्याचे महत्त्व माहित होतं. त्यांच्या घोषणेचा अर्थ होता, 'जो समुद्रावर नियंत्रण ठेवू शकतो तो सर्वात शक्तिशाली आहे, असं शिवाजी महाराज म्हणायचे, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.  

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने राष्ट्र परावलंबीपणाची मानसिकता सोडून पुढे जात आहे. मला आनंद आहे की, आमच्या नौदल अधिकाऱ्यांनी परिधान केलेले इपॉलेट्स आता असतात. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची झलक पहायला मिळेल. नवीन इपॉलेटवर आता शिवाजी महाराजांच्या सैन्याचे प्रतीक असेल. हे माझे भाग्य आहे की मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाशी नौदल ध्वज जोडण्याची संधी मिळाली, असं मोदी म्हणाले आहेत.

आमच्या वारशाचा अभिमान बाळगून, मला घोषित करताना अभिमान वाटतो, की भारतीय नौदलातील रँकचे भारतीय संस्कृतीनुसार नामकरण केले जाईल. आम्ही यावर देखील काम करत आहोत. आमच्या संरक्षण दलात महिलांची शक्ती वाढवत आहे. नौदलाच्या जहाजावर देशातील पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसरची नियुक्ती केल्याबद्दल मी नौदलाचे अभिनंदन करू इच्छितो, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

निराशावादाच्या राजकारणाचा पराभव करून, जनतेने प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याची शपथ घेतली आहे. हे व्रत आपल्याला विकसित भारताकडे घेऊन जाईल. हे व्रत भारताचा इतिहास हा केवळ १००० वर्षांच्या गुलामगिरीचा, पराभवाचा आणि निराशेचा नाही तर भारताचा इतिहास हा विजय, शौर्य, ज्ञान, विज्ञान, कला आणि आपल्या नौदल कौशल्याचा आहे, असंही मोदी म्हणतात.