राज्यातील जिल्हा न्यायालयात क्लर्क, शिपायाची हजारो पदे भरणार, 'येथे' पाठवा अर्ज

District court Recuitment: महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या संवर्गातील 4 हजार 629 पदे भरली जाणार आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 4, 2023, 04:25 PM IST
राज्यातील जिल्हा न्यायालयात क्लर्क, शिपायाची हजारो पदे भरणार, 'येथे' पाठवा अर्ज  title=

District court Recuitment: राज्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे.  राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांमध्ये मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या ४३ विभागांतर्गत पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. दरम्यान७५ हजार पदांची भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या संवर्गातील 4 हजार 629 पदे भरली जाणार आहेत. जिल्हा न्यायालय भरती 2023 अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील स्टेनोग्राफर, ज्युनिअर क्लर्क, कॉन्स्टेबल, पोर्टर या रिक्त पदांचा समावेश आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना दिलेल्या मुदतीपर्यंत आपले अर्ज पाठवायचे आहेत. 

आज 4 डिसेंबरपासून याच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारांना  18 डिसेंबरपर्यंत अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

अधिकृत वेबसाइट http://www.bombayhighcourt.nic.in  याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा  दिलेल्या मुदतीनंतर अर्ज पाठवल्यास तो विचारात घेतला जाणार नाही याची नोंद घ्या.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

कल्याण डोंबिवली पालिकेत नोकरी

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची माहिती आहे. या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. तर थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची माहिती आहे. या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. तर थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेकडून पदभरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील भरतीमध्ये सेवानिवृत्त उप परिवहन प्रशासक, सेवानिवृत्त लेखाधिकारी, उपमुख्य लेखा परीक्षक ही पदे भरली जाणार आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. केडीएमसी अंतर्गत एकूण 3 रिक्त जागा भरल्या जातील. या अंतर्गत सेवानिवृत्त उप परिवहन प्रशासक, सेवानिवृत्त लेखाधिकारी आणि उपमुख्य लेखा परीक्षकची प्रत्येकी 1 जागा भरली जाणार आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील भरतीमध्ये सेवानिवृत्त उप परिवहन प्रशासक, सेवानिवृत्त लेखाधिकारी, उपमुख्य लेखा परीक्षक ही पदे भरली जाणार आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. केडीएमसी अंतर्गत एकूण 3 रिक्त जागा भरल्या जातील. या अंतर्गत सेवानिवृत्त उप परिवहन प्रशासक, सेवानिवृत्त लेखाधिकारी आणि उपमुख्य लेखा परीक्षकची प्रत्येकी 1 जागा भरली जाणार आहे. 

उमेदवारांना कल्याण येथे नोकरी करावी लागेल. तसेच यासाठी 65 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. उमेदवारांनी आपले अर्ज कल्याण डोंबिवली महानगरपालिका, परिवहन मुख्यालय, शंकरराव चौक, कल्याण - पश्चिम येथे आपले अर्ज पाठवायचे आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 11 डिसेंबर 2023   पर्यंत अर्ज करता येणार आहे.  दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्या. तसेच अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.