पालघर लोकसभा पोटनिवडणूक : शिवसेनेने श्रीनिवास वनगांना उमेदवारी

पालघर लोकसभा पोट निवडणुकीसाठी अखेर शिवसेनेनं श्रीनिवास वनगांना उमेदवारी दिली आहे.  

Updated: May 8, 2018, 01:10 PM IST
पालघर लोकसभा पोटनिवडणूक : शिवसेनेने श्रीनिवास वनगांना उमेदवारी title=

मुंबई : पालघर लोकसभा पोट निवडणुकीसाठी अखेर शिवसेनेनं श्रीनिवास वनगांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना उमेदवार श्रीनिवास चिंतामण वनगा सकाळी ११ वाजता पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर भाजप दुर्लक्ष करत असल्याचा वनगा कुटुंबीयांचा आरोप आहे. त्यानंतर वनगा कुटुंबीयांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेनं श्रीनिवास वनगांना शिवसेनेनं भूमिगत केलं होतं.

पालघरमधून कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय भाजप आज घेणार आहे. यासंदर्भात पालघरमधील भाजप संबंधितांची बैठक सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडली.  १० मे रोजी भाजपचा उमेदवार अर्ज भरणार हे या बैठकीत ठरवण्यात आलंय. जो उमेदवार द्यात तो निवडून आणू असा ठराव पदाधिकाऱ्यांनी एकमतानं केला. उमेदवार निवडण्याचे अधिकार पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनाच दिलेत. यासंदर्भात आज आणखी एक बैठक होणार असून, त्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचं समजतंय.