नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, दोन ट्रक जाळल्याने दहशत निर्माण

 गट्टा येथे नक्षलवाद्यांनी दोन ट्रक जाळून चालकाला मारहाण केल्याची घटना घडल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. 

Updated: May 8, 2018, 10:50 AM IST
नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, दोन ट्रक जाळल्याने दहशत निर्माण title=

गडचिरोली : मुलचेरा तालुका स्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गट्टा येथे नक्षलवाद्यांनी दोन ट्रक जाळून चालकाला मारहाण केल्याची घटना घडल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. मुलचेरा पोलीस स्टेशन अंतर्गत एटापल्ली रस्त्यावरील गट्टा या गावातील जंगलात वनविकास महामंडळाचे वृक्ष तोडणीचे काम सुरु आहे. याचा मोका साधत नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातला आणि ट्रक जाळून आपली दहशत निर्माण केली.

दिवसभर काम झाल्यावर रात्री चारचाकी वाहन गट्टा गावात ठेवली जाते याच वाहनांना काल रात्री नक्षलवाद्यांनी टार्गेट केले असून मध्यरात्री सुमारे १२ च्या दरम्यान मोठ्या संख्येने शस्त्रधारी नक्षलवादी गावाजवळ आले.  तीन ते चार नक्षलवाद्यांनी गावात झोपलेल्या वाहन चालकांना उठवून मारहाण केली आणि चारचाकी वाहन गावाबाहेर लावायला सांगितली. त्यानंतर चारचाकी वाहने जाळून टाकली. गट्टा रस्त्यावर मोठमोठे बॅनर लावून कसनासूर -बोरिया घटनेचा निषेध करत १० में रोजी गडचिरोली जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.