Maharastra Rain Alert: संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनची हजेरी, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी!

Maharastra rain update: आयएमडीने 26 ते 28 जूनपर्यंतचे अंदाज जारी केले आहेत. त्यानुसार मुंबई आणि नागपूरला मुसळधार पावसाचा इशारा (IMD Rain Alert) देण्यात आला आहे.

Updated: Jun 25, 2023, 09:14 PM IST
Maharastra Rain Alert: संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनची हजेरी, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी! title=
IMD Maharastra Rain Alert

Monsoon Update : सर्वांना प्रतिक्षा असलेला मान्सून आता संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागानं (Indian Meteorological Department) याची घोषणा केली आहे. देशातील बहुतांश भागात मान्सूननं जोरदार मुसंडी मारली असल्याने आता यंदाचा चांगलं पिकपाणी येण्याची शक्यता आहे. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा या राज्यात तुलनेने पाऊस कमी झाल्याचं दिसून येतंय. मात्र, येत्या काळात पाऊस धुमाकूळ घालू शकतो. अशातच आता भारतीय हवामान विभाग म्हणजे आयएमडीने (IMD) काही राज्यांना अलर्ट जारी केलाय.

आयएमडीने 26 ते 28 जूनपर्यंतचे अंदाज (Maharastra Monsoon Update) जारी केले आहेत. त्यानुसार मुंबई आणि नागपूरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आगामी 4 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा (IMD Rain Alert) देण्यात आला आहे.

आणखी वाचा - Mumbai Rain : मुंबईत पावसाला सुरुवात, 'हाय टाईड'चा इशारा

26 जून -  रायगड, रत्नागिरी, पुणे, नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

26 जून - मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, सातारा, कोल्हापूर , सिंधुदुर्ग, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अ‍ॅलर्ट जारी करण्यात आलाय.

27 जून - पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. 

27 जून -  सातारा, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. 

28 जून - पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी, रायगड आणि नाशिक या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.

28 जून - रत्नागिरी, सातारा, अमरावती, वर्धा आणि नागपूरला यलो अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे.

पाहा ट्विट 

दरम्यान, याशिवाय उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पालघर, अहमदगनर, सोलापूर, सातारा आणि बीडमध्ये पाऊस चांगली झलक दाखवण्याची शक्यता आहे.