ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई : कर्जमाफीचे तीन तेरा वाजले असतानाच मुख्यमंत्री यांनी नियमित कर्ज परत करणा-यांना प्रोत्साहनपर दिली जाणारी पंचवीस हजार रूपये रक्कमेत वाढ करण्याचे आश्वासन दिलंय. एकाबाजूला कर्जमाफी योजना अंमलबजावणी नाही दुसरीकडे सरकारी घोषणा पाऊस यामुळे कोंडीत पडलेल्या सरकारवर विरोधकांनी मात्र टीकास्त्र सोडलंय.
पुण्याच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हे नवं आश्वासन दिलं. मुख्यमंत्री कर्जमाफी योजना पूर्ण अंमलबजावणी होण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी बळीराजाला दिलेला हा नवा दिलासा. कर्जमाफी घोषणा होण्याआधी दहा हजार मदत उचल देण्याची घोषणा होती. राज्यात अवघ्या ५२ हजार ९०० शेतकरीना फक्त याचा लाभ झाला. राज्यात कर्जमाफी अर्ज सुमारे ७७ लाख आहे. त्यातील अवघे ५५ हजार शेतकर्या्ना ३७२ कोटी रूपये वाटप झाले. पुढील आठवड्यात कर्जमाफी बहुतेक लाभार्थ्यांना रक्कम दिली जाईल असे आश्वासन सरकार देते.
मागील काही दिवसात कर्जमाफीचा उडालेला ऑनलाईन गोंधळ आणि शेतक-यांचा मनस्ताप यामुळे सरकारची कोंडी झालीय. त्या सर्वात पंचवीस हजाराचे नवं आश्वासन तरी वेळेत मिळालेला दिलासा ठरो हीच सर्वसामान्य बळीराजांची अपेक्षा आहे.