मुख्यमंत्र्यांचे गंभीर स्थितीत थिल्लर वक्तव्य, फडणवीसांचा पलटवार

फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Updated: Oct 19, 2020, 06:35 PM IST
मुख्यमंत्र्यांचे गंभीर स्थितीत थिल्लर वक्तव्य, फडणवीसांचा पलटवार  title=

मुंबई : मुख्यमंत्री गंभीर परिस्थितीत थिल्लर स्टेटमेंट करणे सोडत नाहीत असा पलटवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी बांधावर न जाता पुलावरून पहाणी केली. थोडा वेळ का होईना बाहेर पडले  तर आता मदत जाहीर करा असेही ते म्हणाले. 'देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर पंतप्रधान ही बाहेर पडतील त्यांनी तिथेही जावे', असा टोला सोलापूर दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी लगावला होता. 

माझ्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दौऱ्याचं नियोजन केलं अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर केली होती. महाराष्ट्रातील शेतकऱ्याला टोलवाटोलवी नको आहे. राज्य सरकार काय करणार आहे हे स्पष्टपणे सांगावे अशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मागणी असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. मी तर बिहारमध्ये होतो, निवडणूक प्रचार सोडून इथे आलो, मुख्यमंत्री तर महाराष्ट्रमध्येच होते ना ? असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला. 

मुख्यमंत्री घरात राहून कारभार चालवत असल्याची टीका होत असताना शरद पवारांनी यावर उत्तर दिलं आहे. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काम करा आम्ही सदस्य म्हणून बाहेर जाऊन काम करु असं पवारांनी म्हटल्याचं सांगत यासंदर्भातील प्रतिक्रिया फडणवीस यांना पत्रकारांनी विचारली. “पवारांना या सरकारचा बचाव करावा लागत आहे. या सरकारचा नाकर्तेपणा बाहेर येतोय. त्यामुळे असंतोष तयार झालेला आहे. त्यामुळे रोज या सरकारचा बचाव करणं एवढचं काम पवारांकडे आहे,” असं फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना धीर देत म्हणाले. राज्यावर आलेल्या आपत्तीचं संकट फार मोठं आहे. राज्यात २२ ते २४ तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला होता. अता अतिवृष्टी होवू नये हिच प्रार्थना. पण जी काही मदत करायची आहे, त्यामध्ये सरकार कोठेही मागे राहणार नाही. असं अश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलं.