एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारातच...?

दिवाळी संपेपर्यंत एसटी संपावर तोडगा निघण्याची शक्यता नाही.

Updated: Oct 19, 2017, 08:07 PM IST
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारातच...? title=

मुंबई : दिवाळी संपेपर्यंत एसटी संपावर तोडगा निघण्याची शक्यता नाही.

कारण एसटी संघटनांसोबत आज बैठकीची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे संप सुरूच राहणार असल्याचं दिसतंय. तसंच परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीत ठोस निर्णय झाला नाही. 

रावतेंनी रात्री दिलेल्या प्रस्तावावर एसटी महामंडळ ठाम आहे. तर दुसरीकडे कर्माचारी संघटनाही पगारवाढीच्या प्रस्तावावर ठाम आहेत. त्यामुळे संपाचा तिढा कायम आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचारी संघटनांना चर्चेला बोलवले तरच तोगडा निघण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

काल रात्री झालेल्या बैठकीत सरकारकडून ११०० कोटी रुपयांच्या पगारवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला... तर कर्मचारी संघटनांनी ४५०० कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव २२०० कोटी रुपयांपर्यंत खाली आणला आहे. आता सरकार ११०० कोटी रुपयांच्या वाढीवर तर संघटना २२०० कोटी रुपयांच्या प्रस्तावावर ठाम आहे.