मुंबई : शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टाने जमीन अर्ज फेटाळल्यानंतर अडचणीत आलेले भाजप आमदार नितेश राणे आज पोलीस चौकशीला सामोरे जाण्यास तयार झाले आहेत.
सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावताना त्यांना पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयाचा पर्याय दिला होता. तसेच त्यांना १० दिवसांची मुदत देण्यात आली होती. काल पुन्हा सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात नितेश राणे यांनी दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
मात्र, आज नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज घेतला मागे घेतला आहे. सुप्रीम कोर्टाने (SC) दिलेल्या दहा दिवसांच्या मुदतीपैकी आणखी 5 दिवसांचे संरक्षण शिल्लक असल्याने अर्ज मागे घेण्यात आला. तसेच, या प्रकरणी ते पोलीस चौकशीला तयार आहेत. तपास अधिकाऱ्यांसमोर ते आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती नितेश राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली.