शिंदेंच्या पावलावर पाऊलः पक्ष फुटलाच नाही, बहुमत अजित पवार यांनाच! -प्रफुल्ल पटेल

NCP: राष्ट्र्रवादी कॉंग्रेस पक्षासंदर्भात चुकीची माहिती आणि संभ्रम पसरवण्यात येत आहे. खरी परिस्थिती लोकांना कळावी यासाठी पत्रकार परिषद घेत असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 7, 2023, 05:31 PM IST
शिंदेंच्या पावलावर पाऊलः पक्ष फुटलाच नाही, बहुमत अजित पवार यांनाच! -प्रफुल्ल पटेल title=

NCP: राष्ट्रवादीत कोणतीही फूट नसल्याचे एनसीपीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्र्रवादी कॉंग्रेस पक्षासंदर्भात चुकीची माहिती आणि संभ्रम पसरवण्यात येत आहे. खरी परिस्थिती लोकांना कळावी यासाठी पत्रकार परिषद घेत असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. 

30 जून 2023 रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची महत्वाची बैठक देवगिरीला झाली. यात महत्वाचे नेते, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते येथे उपस्थित होते. या बैठकीत सर्वांनुमते अजित पवार यांना आपला नेता म्हणून निवडले. यावेळी त्यांनी मला (प्रफुल्ल पटेल) राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. त्यानंतर अजित पवार हे विधीमंडळाचे नेते आहेत हे मी सूचित केले. पक्ष म्हणून अनिल पाटील यांना प्रतोद म्हणून मी माझ्या सहीने नियुक्त केले. अमोल मिटकरी यांना प्रतोद म्हणून नियुक्त करीत असल्याचे त्याचवेळी आम्ही विधान परिषद सभापतींना कळविले.

अजित पवारांनी 30 जूनला याचिका दाखल केली आहे. आम्ही राजकीय पक्ष म्हणून जी भूमिका घेतली ती योग्य असल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले. जयंत पाटील यांनी अजित पवार आणि 8 आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. पण आमच्या पक्षाच्या संविधानानुसार ते आमचे अध्यक्ष नाहीत.त्यामुळे त्यांना हा अधिकार नाही. 

भाषणातील महत्वाचे मुद्दे

आम्ही पक्ष असल्याने चिन्ह आम्हाला मिळावे यासाठी मागणी केली आहे.

आमच्या पक्षाची संस्थात्मक रचना चुकीची आहे.

पक्षाचे बहुमत अजितदादांच्या पाठीशी आहे.

पक्षाअंतर्गत काही बदल करायचे असतील तर ते थांबविता येत नाहीत, असे सुप्रीम कोर्टाचे म्हणणे आहे.

दिल्लीतील राष्ट्रवादीची बैठक अधिकृत नाही.