पंढरपूरः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणारे शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत असं जळजळीत वक्तव्य करत भाजप आमदारानं पुन्हा एकदा अनेकांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या आहेत. पत्रकारपरिषदे दरम्यान आपली ठाम भूमिका आणि हे जळजळीत वक्तव्य करणारे आमदार आहेज गोपीचंद पडळकर.
कार्यकर्ता भेटीच्या निमित्तानं दौऱ्यावर असतेवेळी त्यांनी हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांच्यावर बोचरी टीका करत त्यांची तुलना पडळीकरांनी कोरोना व्हायरसशी केली. पवार हे राज्याचा झालेला कोरोना असल्याचं चे म्हणाले.
अवकाळीच्या वेळी शरद पवार यांनी नाशिकला भेट दिली, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही. यानंतर आता काही दिवसांपूर्वीच कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या 'निसर्ग' चक्रीवादळामुळं नुकसान झाल्यानंतरही पवारांनी वादळग्रस्त भागाला भेट दिली. तेथील नागरिकांची भेटही घेतली. पण, अद्याप या ठिकाणीसुद्धा मदत मात्र मिळालेली नाही. असं म्हणत कोरोना काळातही सराकरमध्ये एकमत नसल्याचं म्हणत जळजळीत टोला लगावला.
पत्रकार परिषदेमध्ये पडळकर यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना उद्देशूनही वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. 'सध्या कोरोना संसर्ग असल्याने पंढरपूरात जर बाहेरील लोक, महाराज मंडळीना प्रवेश नसेल तर आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करू नये. सामान्य शेतकरी कुटुंबातील वारकरी कुटूंबास महापूजेचा मान द्यावा', असं ते म्हणाले.