नवी मुंबईत शिक्षिकेने वर्गातच 5 वर्षाच्या विद्यार्थिनीचे केस धुतले; सत्य समोर येताच पालकांना धक्का बसला

नवी मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. एका शिक्षिकीने आपली चुकी लपवण्यासाठी विद्यार्थीनीचे केस धुतले आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Sep 20, 2024, 07:24 PM IST
नवी मुंबईत शिक्षिकेने वर्गातच 5 वर्षाच्या विद्यार्थिनीचे केस धुतले; सत्य समोर येताच पालकांना धक्का बसला title=

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत एक विचित्र घटना घडली. खाजगी शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षिकीने तिच्याकडे शिकवणीसाठी येणाऱ्या पाच वर्षाच्या चिमुरडीचे क्लासमध्येच केस धुतले. पालकांना जेव्हा  ही बाब समजली तेव्हा त्यांनी मुलीकडे विचारणा केली.  चौकशीत जे सत्य आले ते समजल्यावर पालकांना धक्का बसला. 

नवी मुंबईतील उरण परिसरात ही घटना घडली आहे. मुलगी शिकवणीवरुन घरी आल्यावर पालकांना तिचे केस ओले दिसले. यामुळे पालकांनी मुलीला याबाबत विचारले. यावेळी मुलीने तिच्यासह नेमकं काय घडलयं हे पालकांना सांगितल्यावर त्यांना धक्का बसला.

नेमकं काय घडलं?

उरण मधील जासई येथे ही घटना घडलेय.  घरगुती शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेने पाच वर्षांच्या मुलीच्या डोक्यात पेनाचा धारदार टोक मारून तिला जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आलेय. नीता म्हात्रे असे या  शिक्षिकेचे नाव आहे. या शिक्षिकीने पाच वर्षाच्या चिमुरडीच्या डोक्यावर टोकदार पेनाने हल्ला केला. मुलाला गंभीर इजा झाली. पेनाचे टोक टोचल्यामुळे मुलीच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. यामुळे भयभित झालेल्या शिक्षिकेने चिमुकलीचे केस देखील. शिकवणीची वेळ संपल्यावर मुलगी घरी गेली.  मात्र ओले केस पाहून घरच्यांनी चिमुकलीला विचारपूस केली असता तिने शिक्षिकेने मारहमा केल्याचे सांगितले. यानंतर सदर दुर्दैवी घटना समोर आली. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून शिक्षिकेवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. 

टीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालीये..तर 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणारेय...महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून येत्या 10 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ही अर्ज प्रक्रीया सुरू झालीये...
तीन शाळकरी विद्यार्थ्यांना विहिरीत ढकलून मारण्याचा प्रयत्न 

नाशिकच्या सिन्नर तालुक्यात वडगाव पिंगळा गावातील घटनेने जिल्हा हादरला आहे.  तीन शाळकरी मुलांना विहिरीत ढकलून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.  विहिरीतील कासव पाहण्यासाठीच्या निमित्ताने घेऊन जात मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.  एकाने मुलाने विहीरीतील दोरीला पकडून स्वतःचा जीव वाचवत इतर दोघांचा जीव वाचवला.  तिघांनी घरी येत आई-वडिलांना संपूर्ण कैफियत सांगितली आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. सिन्नर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.  सिन्नर पोलिसांनी अमोल लांडगेला केली अटक, दोघे संशयित फरार आहेत.