Thane and Borivali Twin Tunnel in Mumbai : लवकरच तुमची घोडबंदरील वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. कारण मुंबई महानगर प्रदेशातील मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांना जोडून वाहतूक कोंडी सोडण्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भूमिगत भुयारी मार्गाच्या प्राधिकरणाने ठाणे आणि बोरिवली दरम्यान अंतर कमी होणार आहे. तसेच ठाणे आणि बोरीवली या प्रकल्पामुळे सुमारे एक तासाच्या वेळेत बचत होणार आहे. आता या प्रकल्पासाठी राज्य वन्यजीव मंडळाने परवानगी दिली असून घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी टाळून थेट मुंबईतून ठाणे किंवा ठाण्यातून मुंबई असा प्रवास करणे शक्य होणार आहे.
घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीमुळे ठाणे - बोरिवली प्रवासाला सध्या दीड तास लागतो. यातून मार्ग काढण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालून भुयारी मार्ग काढून अवघ्या 20 मिनिटांमध्ये बोरीवलीमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे.
Happy to inform that the National Board of Wildlife has granted approval to the #Thane #Borivalli Twin #Tunnel. This marks an important milestone in starting work of this watershed #project#RebootingMumbai #ReshapingMMR #MumbaiIsUpgrading #MMRDA #UrbanTransformation pic.twitter.com/E3ZqOAriWR
— Dr. Sanjay Mukherjee (@DrSanMukherjee) February 3, 2024
बोरीवली आणि ठाणे जिल्ह्याच्या भूमिगत भूमिगत मार्गाने जोडणाऱ्या या प्रकल्पाच्या व्याप्तीमध्ये 10.25 किमीचा बोगदा आणि 1.55 किमीचा पोहचमार्ग असा 13.05 मीटर अंतर्गत व्यासास सुमारे 12 किमी लांबीचा दुहेरी भूमिगत बोगदा असणार आहे. या बोगद्याच्या दोन्ही बाजूस 2+2 मार्गिकांसह आपत्कालीन मार्ग देखील आहे. प्रत्येक 300 पादचारी क्रॉस पॅसेज आणि प्रत्येक 2 पादचारी क्रॉस पॅसेजरनंतर वाहन क्रॉस पॅसजेची तरतूद करण्यात आली आहे.
- 10.25 किमी बोगदा आणि 1.55 किमी अप्रोच रोड प्रकल्प क्षेत्रात 13.05 मीटर व्यासासह सुमारे 12 किमी लांबीचा दुहेरी भूमिगत बोगदा आहे.
- बोगध्याच्या दोन्ही बाजूला 2+2 लेन असलेले आपत्कालीन रस्ते आहेत.
- प्रत्येक 300 मीटरनंतर पादचारी क्रॉस पॅसेज आणि प्रत्येक 2 पादचारी क्रॉस पॅसेजनंतर वाहन क्रॉस पॅसेजची तरतूद.
- बोगद्याचे बांधकाम आधुनिक तंत्रज्ञान आणि चार टनेल बोअरिंग मशिनच्या मदतीने केले जाणार आहे.
- अंदाजे 12 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पापैकी 4.43 किलोमीटर लांबीचा ठाणे जिल्ह्यात तर 7.4 किलोमीटर लांबीचा बोरिवली जिल्ह्यात प्रस्तावित आहे.
- बोगांमध्ये अग्निशामक यंत्रे, पाण्याचे नाले, स्मोक डिटेक्टर, एलईडी दिवे आणि साईन बोर्ड लावले जातील.
- नैसर्गिक किंवा यांत्रिक माध्यमातून पुरेशी वायुवीजन व्यवस्था निर्माण केली जाईल.
- संजय गांधी नॅशनल पार्क खालून जाण्याचा प्रकल्प आहे.
- पूर्व-पश्चिम लिंक रोड तयार होईल आणि राष्ट्रीय महामार्ग 3 आणि 8 मधील अवजड व्यावसायिक वाहतुकीसाठी कॉरिडॉर म्हणून काम करेल.
सध्या, ठाणे ते बोरिवली दरम्यान घोडबंदर रोडवरील 23 किमी अंतराच्या प्रवासासाठी वरदलीच्या तासांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी एक ते दोन तास आणि इतर वेळी किमान एक तास खर्च येतो.